अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार शाखा तर्फे के.आर सनसिटी येथे प्रबोधन कार्यक्रम

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार शाखा तर्फे के.आर सनसिटी येथे प्रबोधन कार्यक्रम
नंदुरबार दि. ८ (प्रतिनिधी) नवापूर रोड खामगाव शिवार गरबा नवरात्र उत्सव के.आर.सनसिटी येथे अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकारणी समितीचे नंदुरबार जिल्हा प्रधान सचिव वसंत वळवी, राज्य प्रसिद्धीप्रमुख कीर्तीवर्धन तायडे, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समिती, नंदुरबार शाखा अंधश्रद्धा निर्मुलन समिती सचिव सुबोध अहिरे, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, प्रज्ञावंत पिंपळे, दीपक ठाकूर, मिलिंद पिंपळे, नरेंद्र वसावे, जितेंद्र पाडवी, सुभाष मावची, पोलीस वंन्तु गावित, पोलीस राजू गावीत, ईश्वर गावीत, राजेश कोकणी, मनिष वसावे, गणेश अहिरे, किरण पवार, गणेश पाटील, गोकुळदास शिंदे, सुरेंद्र वसावे इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गोपाल गावीत यांनी मनोगतातून समाजमनाला वर्षांनुवर्षे पोखरुन टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करायची असेल, तर सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समित्या हे काम सातत्याने करीत आहेत. आपण देखील सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलन करायला हवे. तरच अंधश्रद्धा निर्मूलनचा हा कलंक पुसून टाकणेन सहजन शक्य होईल. आजचे विज्ञानाचे युग आहे. अंधश्रद्धा निर्मुलन नुसते मोहिमेची कार्यक्रम पाहुन प्रोत्साहीत होऊन तसा विचार करणे नव्हे तर स्वतःमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून, विचार करुन तसे आचरण करणे म्हणजेच खरे अंधश्रद्धा निर्मुलन होय. आणि विज्ञानवादी दृष्टिकोनच अंधश्रद्धेला समूळ नष्ट करु शकतो. अंनिस चे हे कार्य फार महत्वाचे आहे व हाच विचार डॉ.दाभोळकरांचा होता त्यातून हजारो दाभोळकर तयार होऊन विज्ञानवादी भूमिका साकारतील हे वास्तव आहे. असेही मत व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा प्रधान सचिव वसंत वळवी व कीर्तीवर्धन तायडे राज्य प्रसिद्धी प्रमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अनेक अंधश्रध्दा निर्मुलनाचे प्रयोग करुन दाखवले. सर्व नागरिक, मुलांनी बारकाईने निरिक्षण केले. त्या मागील अंधश्रद्धेचे ढोंगीपणा असुन त्यामागचे वैज्ञानिक सत्य आहे हे उपस्थित नागरिक, विद्यार्थ्यांना पटले. समाजात अंधश्रद्धेला बळी न पडता त्यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे हे समजावून दिले. रासायनिक केमिकलच्या माध्यमातून विविध घटक मिश्रण केल्यावर काय परिणाम होतात त्याचे महत्त्व पटवून दिले. यानंतर व्यसनाधीनता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चमत्कारांचे सादरीकरण केले. या प्रयोगांमध्ये प्रामुख्याने पाण्यावर दिवा पेटवणे, लोखंडी रिंग मधून मोठ्या व लहान यामधून रिंग बाहेर काढणे, हवेतून सोने,चांदी वस्तु काढणे, जिभेतून सळई लावणे, लोकांच्या मनातील गोष्ट ओळखणे, चिठ्ठीवर लिहिलेला मजकूर चिट्ठी न उघडता सांगणे, तांब्या मध्ये भूत उतरविणे, तांब्यामधून आपोआपच पाणी काढणे मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे, हवेतून काळे धागेदोरे काढणे व जोडणे असे चमत्कार सादरीकरणाचे प्रयोग करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदुरबार शाखा प्रधान सचिव सुबोध अहिरे यांनी केले व उपस्थितांचे आभार अंधश्रद्धा निर्मूलन समिती सामाजिक कार्यकर्ता प्रवीणकुमार धंदरे यांनी मानले.



