खडसेंच्या भाजपा प्रवेशावर मंत्री महाजणांची टीका -जो दिवा विझलेला आहे त्याबद्दल तुम्ही एवढं का बोलतात

जळगाव,(प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लवकरच भाजपा प्रवेश करून स्वगृही परतणार असल्याचे खुद्द खडसे यांनी माध्यमांना सांगितल्यानंतर भाजपा केंद्रीय नेतृत्वात एकनाथ खडसे प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे दरम्यान भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांना माध्यम प्रतिनिधीनीं खडसेंच्या प्रवेशा बाबत विचारले असता त्यांनी खडसे यांच्यावर तुफान फटकेबाजी करित टीका केली असून उलट मीडिया प्रतिनिधीनांचं प्रश्न केला असून ‘जो दिवा विझलेला आहे त्याबद्दल तुम्ही एवढं का बोलतात असं मंत्री महाजन यांनी म्हटलं असून विझलेला दिवा म्हणून खडसेंचा उल्लेख केला आहे.
काय म्हटले मंत्री महाजन
मंत्री गिरीष महाजन यांना माध्यम प्रतिनिधिनीं खडसेंच्या भाजप प्रवेशा बाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्या प्रवेशाबाबत मला माहिती नाही, आता त्यांच्या कडे काही राहिलेलं नाही. त्यांच्या गावाची सात लोकांची ग्रामपंचायत देखील त्यांच्या कडे नाही ,आमदारकीला त्यांची कन्या पराभूत झाल्या,दुध डेअरी, सहकारी बँक नसल्याची खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
खडसे भाजपा प्रवेश दिल्लीत करणार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या स्वगृही परतणार असून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वात प्रवेश करणार असल्याची माहिती खडसे यांनी मीडियाला दिली आहे. दरम्यान मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.दरम्यान गिरीश महाजन यांनी केलेल्या टिके नंतर खडसेनीं मात्र गिरीष महाजन हे आपले वरिष्ठ नेते आहेत असं म्हणून टोला लगावला असून प्रतिउत्तर देणं टाळलं आहे.



