Blog

प्रामाणिकपणा , कार्यपद्धतीचे प्रतिक – योगेश पाटील सर

जामनेर (प्रतिनिधी) वृषभ इंगळे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक योगेश पाटील हे नाव जळगाव जिल्ह्यात प्रामाणिकपणा, जनहित आणि पारदर्शक कार्यपद्धतीचे प्रतिक म्हणून घेतले जाते. एका अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाटील साहेब.

 

कार्यालयीन कामकाज असो किंवा जनतेच्या तक्रारी सोडविण्याची बाब असो, ते नेहमीच तत्परतेने आणि नियमबद्धतेने निर्णय घेतात. नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांनी प्रशासनातील शिस्त व पारदर्शकता यांना सदैव प्राधान्य दिले आहे. याच कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य माणसाला प्रशासनाकडे विश्वासाने पाहण्याची नवी दृष्टी मिळाली आहे.

साधेपणा, प्रामाणिकता आणि सकारात्मक दृष्टिकोन ही त्यांची कार्यशैली. प्रत्येक निर्णयामध्ये विकासाचे भान, जनतेच्या अडचणी सोडविण्याची तळमळ आणि प्रशासनातील प्रामाणिकपणा हे तिन्ही घटक ते काटेकोरपणे जपतात.

त्यांच्या प्रयत्नांमुळे आश्रमशाळा, शैक्षणिक योजना, तसेच समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये वेगळी उभारी आली आहे. स्थानिक लोक व सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे की, “अधिकारी असावा तर योगेश पाटील साहेबांच्या सारखा”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}