काथर्दे खुर्द प्राथमिक शाळेला श्री. रुपेशभाऊ पाटील यांजकडून साऊंड सिस्टिम भेट!

काथर्दे खुर्द प्राथमिक शाळेला श्री. रुपेशभाऊ पाटील यांजकडून साऊंड सिस्टिम भेट!
नंदुरबार दि.२७ शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्रातील काथर्दे खुर्द प्राथमिक शाळेमध्ये संपन्न होत असलेले विविध सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दैनंदिन परिपाठ, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेची गरज ओळखून काथर्दे खुर्द येथील रहिवासी प्रतिष्ठित नागरिक , प्रगतशील शेतकरी श्री. रुपेशभाऊ राजाराम पाटील यांनी शाळेसाठी ‘साऊंड सिस्टिम’ भेट म्हणून दिली. काथर्दे खुर्द शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळावी यासाठी ही भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. रुपेशभाऊ राजाराम पाटिल ग्रामपंचायत सदस्य काथर्दे खुर्द यांनी जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द साठी चौदा हजार रुपये किंमतीचा साऊंड सिस्टीम तसेच ११०० रु.बक्षीस दिले. या देणगी बद्दल काथर्दे खुर्द शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगीताताई पाडवी, मुख्याध्यापक भरत पावरा तसेच महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, सर्व शिक्षक व पालकांनी विशेष आभार मानले. जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती संगिताताई पाडवी, पंचायत समिती सदस्य सुदामभाई पाटील, सरपंच खंडू ठाकरे, उपसरपंच गणेश भील, ग्रामसेवक मनोहर महीरे, पोलिस पाटील ईश्वरभाऊ वळवी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश निकुंबे, मुख्याध्यापक भरत पावरा, मुख्याध्यापक बी.जी. माळी, उपशिक्षक श्रीकांत वसईकर, तुकाराम अलट, खेमा वसावे, हर्षदा पाटिल, तसेच गावातील पालक, शिक्षणप्रेमी, गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवदास मदन पाटील, डोंगरसिंग गिरासे, गोरख आण्णा गिरासे,उत्तम निकुंबे, खंडु महिरे, विष्णु ठाकरे,उपस्थित होते. उपसरपंच श्री. गणेशभाऊ भील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शालेय परिपत्रकानुसार वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, वाचन स्पर्धा , देशभक्तीपर गीत घेण्यात आले यामध्ये पल्लवी जगन पाडवी, विवेक विष्णू ठाकरे, नरेंद्र किशोर चौधरी, विजय रविंद्र वडार, आकाश येशुनाथ वडार, रूद्र हितेश पटले, साई रमेश वडार, सेजल खंड्या मोरे गणेश गोपाल भील, गुंजन गणेश चव्हाण, रनविरसिंग रविंद्रसिंग गिरासे, भूमी ईश्वर वळवी, भाग्यश्री रमेश वडार अशा विविध विद्यार्थ्यांनी भाषण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून उपस्थित मान्यवरांनी २८५० रू बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सुरेश निकुंबे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांनी भाषण आणि नृत्य सादरीकरण मधील सर्व मुलांना वही, पेन वाटप केले. शाळेच्या वतीने त्यांचा मुख्याध्यापक भरत पावरा सरांच्या हस्ते शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. श्रमिक माध्यमिक विद्यालय काथर्दे खुर्द येथील संदिप जाधव सर यांच्या हॅकथॉन मधील उपक्रमाची जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकांत वसईकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी .एम.सुर्यवंशी तर आभार एन.एम पाटिल यांनी मानले.



