आर्थिक

एकात्मिक अपंग युनिट ४१ शिक्षकांचे सेवा समाप्तीचे आदेश सीईओ सावनकुमार, परंतु मा. नाशिक विभागीय आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचा अजब गजब कारभार पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशाच्या तयारीत

एकात्मिक अपंग युनिट ४१ शिक्षकांचे सेवा समाप्तीचे आदेश सीईओ सावनकुमार, परंतु मा. नाशिक विभागीय आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचा अजब गजब कारभार पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशाच्या तयारीत.

नंदुरबार दि. ४( प्रतिनिधी ) शासनाला बनावट कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचे दर्शवीत अपंग युनिटमध्ये विशेष शिक्षक म्हणून नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी नोकरी मिळविण्यात आली. त्यातून शासनाला एक कोटी २१ लाख ५६ हजार ४९३ रुपयांचा गंडा घातला, अशी तक्रार २०२२ मध्ये झाली होती. ज्याअर्थी जिल्हा परिषद नंदुरबार सीईओ यांना देण्यात आलेल्या पत्रानुसार मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडील पत्रक संकीर्ण -२०२४ विआशा/आस्था -४ नाशिक दि. २४ मे २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने सीईओ सावनकुमार यांनी ४१ एकात्मिक अपंग युनिट प्राथमिक शिक्षकांना सेवा समाप्तीचे आदेश दि. २८ मे २०२४ दिले होते. परंतु जि.प शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांच्या अजब गजब कारभारामुळे सदर ४१ एकात्मिक अपंग युनिट प्राथमिक शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मा. नाशिक विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्राथमिक शिक्षण विभाग यांनी सदरील शिक्षकांकडून आर्थिक देवाण-घेवाण करत असल्याचे एकूणच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. सविस्तर वृत्त केंद्रीय पुरस्कृत अपंग एकात्मिक योजनेतील विशेष शिक्षक / परिचर यांना सदर योजना दिनांक ०१ मार्च, २००९ पासून बंद झाल्याने, सदर योजनेवर कार्यरत असलेल्या विशेष शिक्षक / परिचर यांचे समायोजन करण्याकरिता उक्त शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक या रिक्त पदावर सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली होती. ज्याअर्थी, शासनाचे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग विशेष चौकशी पथकाने (SIT) सादर केलेल्या अहवालानूसार अपंग एकात्म शिक्षण योजना विशेष शिक्षक/परिचर यांच्या समायोजनामध्ये झालेल्या गैरप्रकारची चौकशी करण्यासाठी गठीत विशेष चौकशी पथकाच्या कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दि. ९ फेब्रुवारी २०२३ (SIT) चे प्राप्त अहवालानुसार जिल्हा परिषद, प्राथमिक शाळेतील 41 शिक्षकांचे यांचे समावेशन शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर, २०१० च्या सूचनांनूसार झालेले नाही ही अनियमितता आहे. असा निष्कर्ष दिलेला असून महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभाग पत्रान्वये दि. १२ डिसेंबर २०२२, दि.३१ जानेवारी २०२३,दि.१७ फेब्रुवारी २०२३, दि. २८ मार्च २०२३ सदर विशेष शिक्षक व परिचर यांच्या सेवा समाप्त करण्याच्या अनुषंगाने व त्यांचेवर पुढील नियामानुसार कार्यवाही करणे बाबत कळविणेत आले होते. विशेष चौकशी पथकाचे (SIT) अहवालवरून निर्देशनास आले आहे. प्रस्तावासोबत युनिट मान्यता आदेश. वैयक्तीक मान्यता आदेश यांची तपासणी विशेष चौकशी पथकाने (SIT) कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग आस्था-७ दि. ९ फेब्रुवारी २०२३ अन्वये प्राप्त चौकशी अहवालानुसार संबंधीतांचे नाव शासनाकडील अपंग युनिट विशेष शिक्षकांच्या मुळ यादीत समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयाचे पत्र दि. १७ डिसेंबर २०१८ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येऊन खुलासा मागवण्यात आलेला होता. तरी सदर ४१ प्राथमिक शिक्षक यांनी उच्चस्तरीय समितीच्या निकाल त्यांना मान्य राहील याबाबतचे लेखी रू १०० चे स्टॅम्प पेपर वर हमीपत्र सादर केलेले असून मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नंदुरबार यांना देण्यात आले होते. प्राप्त खुलाशाचे अवलोकन केले असता सदरचा खुलासा समाधानकारक नसल्याने व संबंधिताच्या नियुक्ती शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर, २०१० च्या सूचनांनुसार झालेले नसल्याने संबंधिताचा खुलासा अमान्य करण्यात येत आहे. अंतिम काराणे दाखवा नोटीसीत नमुद कार्यवाही अंतिम कारणे दाखवा नोटीसात नमूद कार्यवाही अंतिम करण्याचे निष्कर्षाप्रत हे प्राधिकरण पोहचले होते. त्या अनुषंगाने विशेष चाकशी पथकाचे अहवालावरुन व शासनाचे वेळोवेळी प्राप्त पत्राच्या अनुषंगाने, मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडील विआशा /आस्था -४ नाशिक दि. २४ मे २०२४ मंजूर टिपणी नुसार श्री. सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून शिक्षण विभागातील मंजूर अपंग युनिट वरील विशेष शिक्षकांच्या मुळयादीत ४१ अपंग युनिट प्राथमिक शिक्षक नंदुरबार जिल्ह्यातील यांचे नाव समाविष्ट नसल्याचे विशेष चौकशी पथकामुळे अहवालावरुन निष्पन्न होत आहे. सदर बाब शासनाची फसवणूक व दिशामुल करणारी असून ४१ प्राथमिक अपंग युनिट शिक्षक यांची कृती शासन नियमाचा भंग करणारी असल्याने संशयास्पद नंदुरबार जिल्ह्यातील ४१ प्राथमिक अपंग युनिट शिक्षक यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील भाग तीन नियम ४ चा (सहा) अन्वये जिल्हा परिषद, नंदुरबार मधील प्राथमिक शिक्षक चा पदावरील सेवा आदेशाच्या दिनांकापासून ते दि. २८ मे २०२४ पर्यंत सेवा समाप्त करण्यात आली आहे. सदर तालुक्यातील कार्यरत सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येऊन तशी नोंद संबंधिताच्या मुळ सेवापुस्तकात घेण्यात आली आहे. या संदर्भात कार्यवाही बाबत नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी दिलेले आहे. जिल्ह्यातील तमाम सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील बांधवांनी धडक कार्यवाहीमुळे सीईओ श्री. सावनकुमार चे अभिनंदन केले आहे. केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मीक शिक्षण योजनेतील ५९५ च्या यादीत नाव नसलेल्या विशेष शिक्षकांचे सेवा समाप्त केलेले शिक्षकांचे नाव:- १) सोनाली रविद्र पाटील जि. प. शाळा राजविहीर ता. तळोदा, २) गणेश कौतीक पाटील जि. प. शाळा करडे ता. तळोदा, ३) गणेश सुरेश पाटील जि. प. शाळा मांजलीपाडा ता. धडगाव, ४) हिराबाई प्रकाश पवार जि. प. शाळा अमोनी ता. तळोदा, ५) किरण मुरलीधर पवार जि. प. शाळा देवाचापाडा ता. धडगाव, ६) शैलेश रविंद्र पाटील जि. प. शाळा उमरागगव्हाण, ७) सतिष शामकांत पाटील जि. प. शाळा चिवउतार ता. अक्कलकुवा, ८) सुहास हेमराज पाटील जि. प. शाळा वेळावद ता. शहादा, ९) विलास बाबुराव माळी जि. प. शाळा लहानटोजा ता. शहादा, १०) विनय उत्तम पाटील जि. प. शाळा नंबरपाडा ता. शहादा, ११) तुषार मधुकर देवरे, जि. प. शाळा हरयापाडा ता. शहादा, १२) दिपक भगवान नागमल जि. प. शाळा ब्रिजप्लांट ता. शहादा, १३) महेंद्र गोविंदराव अहिरे जि. प. शाळा मासलीपाडा ता. नवापूर, १४) कल्पेश कृष्णा चौधरी
जि. प. शाळा जाम ता. शहादा, १५) रोकेश सुरेश नेरकर जि. प. शाळा कन्हाळा ता. शहादा, १६)शितल रमेश साळवे जि. प. शाळा धिरजगाव ता. नंदुरबार, १७) ज्योती आनंदराव अहिरे जि. प. शाळा रजाळे ता. नंदुरबार, १८) विजय गजमल बोरसे जि. प. शाळा रजाळे ता. नंदुरबार, १९) तुषार सुरेश पाटील जि. प. शाळा जाम ता. शहादा, २०) उमेश संतोष महाजन जि. प. शाळा छोटा धनपुर ता. तळोदा, २१)सचिन रघुनाथ पाटील जि. प. शाळा दोराबारीपाडा ता. अक्कलकुवा, २२) अमित अरविंद देशमुख जि. प. शाळा रोहयाबारीपाडा ता. अक्कलकुवा, २३) प्रमोद बाबुलाल शिंदे जि. प. शाळा सणिडोंगरपाडा ता. अक्कलकुवा, २४) राजेंद्र सुरेश काकुस्ते जि. प. शाळा बोकळझर ता. नवापूर, २५) विक्रांत राजेंद्र नांद्रे जि. प. शाळा सारंगखेडा नं. २ ता. शहादा, २६) अशोक परशुराम पाटील जि. प. शाळा खडकी ता. नवापूर, २७) पंकज संतोष माळी जि. प. शाळा चिंचोरा ता. शहादा, २८) उर्मिला श्रीराम माळी जि. प. शाळा घुनशी ता. अक्कलकुवा, २९) मच्छिंद्र छगन बि-हाडे जि. प. शाळा गोपाळपूर ता. तळोदा, ३०) अविनाश मनोहर वाघ जि. प. शाळा दिवडीपाडा ता. अक्कलकुवा, ३१) रुपेश सुरेश भदाणे जि. प. शाळा गुऱ्हाडीपाडा ता. अक्कलकुवा, ३२) पिंटीबाई भिमराव शिरसाठ, जि. प. शाळा जावदे त. ह. ता. शहादा, ३३)निलेश नानाभाऊ काटे जि. प. शाळा कोळदा ता. नवापूर, ३४) अनिल पंडीत पाटील जि. प. शाळा राणीपूर ता. शहादा, ३५) कुणाल नानाभाऊ गुरव जि. प. शाळा रतनपुर ता.शहादा, ३६) प्रतिभा कृष्णा भामरे जि. प. शाळा बोरवण ता. तळोदा, ३७) संदिप वसंत परदेशी जि. प. शाळा केवलापाणी ता. तळोदा, ३८) वैभव भटु सोनवणे जि. प. शाळा पाल्हाबार ता. तळोदा ३९) भगवान पंडीत गढरी जि. प. शाळा केवडीपाणी ता. शहादा, ४०) स्नेहल सुरेश पाटील जि. प. शाळा कडरे ता. नंदुरबार, ४१) शत्रुघ्न चंदन बच्छाव जि. प. शाळा काथर्देदिगर पुनर्वसन ता. शहादा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}