आपल्या धरणीमातेसाठी, निसर्गासाठी एक क्षण! जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केले वृक्षारोपण

आपल्या धरणीमातेसाठी, निसर्गासाठी एक क्षण!
जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केले वृक्षारोपण
जामनेर –( प्रतिनिधी )
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या राष्ट्रीय अभियानाच्या अनुषंगाने आज खादगाव ता. जामनेर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी स्वताः रोपट लावले . व याची काळजी घेण्याचे सुचना केल्या .
या उपक्रमाचा उद्देश केवळ हरित भारताची संकल्पना पुढे नेण्याचा नाही, तर आपल्या मातृभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही आहे. झाड लावणे ही केवळ एक कृती नसून, आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी ती एक सुरक्षित, शुद्ध आणि हरित पर्यावरणाची शपथ आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले .
या प्रसंगी तहसिलदार श्री नाना साहेब आगळे , जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , नप गटनेते डॉ प्रशांत भोंडे , जे के चव्हाण ,
अमर पाटील यांचे सह शाळेच्या शिक्षीका , विद्यार्थी व भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते हजर होते .



