कर्तृत्वान व दुरदृष्टीचे अभियंता – मा. श्री. व्ही. डी. पाटील साहेब


सदाशिव इंगळे – संपादक दैनिक जळगाव प्रहार
जीवनात अनेक व्यक्ती एकमेकांना भेटत असतात. त्यातील सर्वच व्यक्ती लक्षात राहतात, असे नाही. परंतू काही कायमचे लक्षात राहतात ते त्यांच्या वेगळेपणामुळे व निष्ठापूर्वक कार्यशैलीमुळे. अश्याच एका व्यक्तीच्या यशस्वी व असामान्य वाटचालीचा
ओझरता लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ती व्यक्ती आहे श्री.व्ही.डी.पाटील. साहेब (सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता, तापी महामंडळ, जळगाव) एक कर्तृत्वान व दुरदृष्टीचा अभियंता आणि सृजनशिल, सदसद विवेकबुध्दीचा धनी माजी माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील साहेब .
सिंचन विभाग आणि व्हि. डी. पाटील हे जणू अविभाज्य घटक म्हणता येईल. त्यांच्यातील कर्तव्यतत्पर, नावीन्याचा ध्यास घेतलेला अभियंता असाच अनुभव नेहमी जनतेला आला. जळगाव पुरता विचार केला तर ही व्यक्ती प्रशासकीय यंत्रणा, समाज, राजकारणी, शेतकरी आदी सर्वच घटकात सर्वमान्य म्हणून परीचीत आहे.
नवनवीन संकल्पना व सिंचनप्रकल्पाच्या मान्यतेसाठी त्यांनी खान्देशातील नेते मंडळीचा खूबीने केलेला वापर, विलक्षण असाच आहे. तसेच सिंचनक्षेत्रातील अभियांत्रिकी ज्ञानासह त्यांच्या कल्पकतेचा सद्धपयोग वापर केला . राजकारणी आणि शासकीय अभियंता यांच्यातील समन्वयाचा व विश्वार्हतेचा असा मजबूत बंध दुर्मिळच म्हणावा लागेल.
विविध सिंचनप्रकल्पांच्या उभारणीच्या माध्यमातून सामाजिक नेते, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी यांच्याशी असलेलं परस्पर विश्वासाचं नातं, वर्षानुवर्षे जोपासणारे व्यक्ती म्हणून त्यांचा लौकीक मान्य करावा लागेल. जळगाव विभागातील सिंचन विकासातील जल पुरुष असे त्यांना संबोधल्यास अतिशोक्तीचे ठरणार नाही. लोकप्रतिनिधी यांच्याशी सिंचनक्षेत्राच्या प्रश्नाबाबत असलेले नाते नेहमी जिव्हाळ्याचे, आत्मसन्मानाचे व पारदर्शक असल्याचे दिसून येते. असा लौकीक व लोकमान्यता असणारे ते जळगाव जिल्ह्यातील पहिलेच अधिकारी अथवा अभियंते असतील. त्यांनी सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी केलेली धडपड ही त्यांच्या बौध्दीक कौशल्याचा परिचय देणारी आहे. माहिती आयुक्त पदभार असतांना त्यांनी त्यांचे अभ्यास पुर्ण शैलीमुळे अनेक अपिल प्रकरणे काही कालावधीतच निकाली काढली आहे ,संबधीतांना न्याय देण्याचे कामकाज केले आहे .
शालेय जीवनापासून ते अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण मेरीटमध्ये संपादन करणारे व्ही.डी.पाटील, सिंचन क्षेत्रातही मेरीटोरीयस ठरले हे विशेष. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला मेगा रिचार्ज, बोदवड उपसा जलसिंचन आणि जामनेरमधील कमानी तांडा हे महत्वकांक्षी प्रकल्प त्यांच्या दुरदृष्टीसह अभियांत्रिकी ज्ञानाचा परीपाक म्हणता येईल. अधिक्षक अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते सिंचन प्रकल्पांच्या प्रश्नांसाठी आपले योगदान सदैव देत आहे , त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग घेऊन जळगाव जिल्ह्यातील अती उत्कृष्ठ पणे कामे करता येईल अशी जनतेची मागणी असल्याचे दिसत आहे.
त्यांच्या या दुरदृष्टी मुळे जामनेर तालुक्याला पाणी टंचाईचे संकट उदभवले नाही, त्यांच्या या कल्पकतेच्या बुध्दीचा वापर शासनाने केला तर नक्कीच अनेक प्रकल्पाला गती मिळेल. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे त्यांच्या कल्पने दुरदृष्टी ने करत असलेले शेततळे व इतर योजना.
आज ही सेवा निवृत्त होउन सुद्धा पायाला भिंगरी बांधून जिल्हासाठी व तालुक्यासाठी काम करण्याची धडपड व अधिकारी यांना करत असलेले मार्गदर्शन बघायला मिळत आहे.
अश्या अभ्यास गुण संपन्न व्यक्ती चा उपयोग आताचे राज्य कारभार पाहणारे लोकप्रतिनिधी यांनी जनहितासाठी करावा व त्यांना जलसंपदा विभागत १ मोठ्या पदावर बसवून जनकल्याणासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी , जनसामान्य माणसातून व्यक्त होत आहे .


