बोरवण जि. प. शाळेस प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांची सदिच्छा भेट.

बोरवण जि. प. शाळेस प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांची सदिच्छा भेट. दि.८ ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात शिक्षणाचे काम अविरत चालू असून, शासनाच्या अनेक विविध योजनेतून येथील विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे, यात भरीव योगदान म्हणून राज्यभरात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रम राबविला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद शाळा बोरवण शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले होते. शाळांनाही प्रोत्साहन मिळावे म्हणून पारितोषिक, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. असेही शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गावित, शिक्षक श्री. रमेश गावित सांगितले. अतिपरिश्रमाने शाळेला वैभव प्राप्त करून दिले आहे. यावेळी भादवड केंद्राचे केंद्रप्रमुख के.टी सूर्यवंशी, प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गोपाल गावित, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, श्रावणी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक भटू बंजारा शाळेत सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. मान्यवरांचा शाळेमार्फत शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेसह परिसराचे सौंदर्यीकरण, गुणवत्ता, व्यक्तिमत्व विकास, शाळेची इमारत व छत परिसर राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम, क्रीडास्पर्धा, आरोग्य, आर्थिक साक्षरता आदी उपक्रम शाळेत राबविण्यात आले यांची माहिती घेतली. या अभियानात बोरवण जि. प. शाळांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. शासनाने राबविलेल्या शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम कोणती शाळा अचूक राबविते यासाठी केंद्रस्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली. विविध उपक्रमांची माहिती संकलित करुन शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या ऑपवर ही माहिती दिल्यानंतर बोरवणच्या शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेतील शिक्षक श्री. रमेश गावित यांनी लोकसहभागातून शाळेचा कसा विकास होतो याचीही माहिती दिली. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी केलेली स्वच्छतेची माहिती समाजमाध्यमांवर दर्शविली गेली. वर्गांची सजावट, तंबाखूमुक्त शाळा, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, गांडूळ खत प्रकल्प, पोषण आहाराअंतर्गत परसबागेतील भाजीपाला, फळबागेतील माहिती, चित्रकला, वकृत्व स्पर्धेसारख्या विविध स्पर्धेच्या उपक्रमाची माहिती शिक्षकांनी मॉनिटर ऑपमध्ये अचूक दिल्याने तसेच शाळेतील सुशोभिकरण, विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी करुन घेतलेल्या उपक्रमांमुळे ही निवड झाली. मत मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी सांगितले. केंद्रप्रमुख के.टी सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की भविष्यात कोणत्या गोष्टींना सामोरे गेले पाहिजे, परिस्थितीशी सामना करून आपल्या आई-वडिलांचे नाव उंचावत ठेवून उत्तम शैक्षणिक कामगिरी करावी. शिक्षक, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम अगदी सुंदर व गतिमान असून, हा उपक्रम शाळेच्या प्रगतीसाठी निश्चितच फायद्याचा होईल, पारितोषिक प्राप्त करण्यासाठी सहभाग घेण्याच्या स्पर्धेबरोबरच शैक्षणिक, भौतिक सुविधा मिळतील. त्यामुळे या अभियानाचा विद्यार्थ्यांना व शाळेला निश्चितच लाभ होईल. असेही मत नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी व्यक्त केले.



