जळगाव जिल्हा प्रशासन – आता केवळ एक मेसेजच्या अंतरावर! आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे जळगाव –तुमच्या शंका, अडचणी, तक्रारी किंवा सूचना सांगायला आता गरज नाही अनेक दारे ठोठावण्याची! ✅ जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्याशी थेट संवाद साधा – फक्त एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवा! 📞 WhatsApp क्रमांक: 8275970672 प्रशासनाशी संबंधित तुमच्या अडचणी, तक्रारी, सूचना, सल्ले यासाठी हा अधिकृत आणि सक्रिय दुवा आहे. कृपया अनावश्यक मेसेजेस आणि कॉल्स करण्याचे टाळा. आपली माहिती, प्रश्न आणि अभिप्राय प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा विश्वासार्ह मार्ग आहे. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे .