परिवर्धा जि.प शाळेत आनंददायी शनिवार निमित्त पर्यावरण रक्षाबंधन कार्यक्रम.

परिवर्धा जि.प शाळेत आनंददायी शनिवार निमित्त पर्यावरण रक्षाबंधन कार्यक्रम.
नंदुरबार दि.१६ (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा परिवर्धा येथे विद्यार्थ्यांनी झाडाला राख्या बांधून दिला पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. जिल्हा परिषद केंद्र शाळा परिवर्धा येथे विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी प्राचीन वृक्षाला म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दीर्घायुष्य व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना घेतली.
भारती संस्कृतीचा महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णिमेचा सण उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी बहीण प्रेमाचे प्रतीक म्हणून भावाला राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावी तसेच त्यांचे प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात हाच संदेश घेऊन विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाच्या संदेश दिला तसेच राखी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा म्हणजेच पुठ्ठा,दोरा जुन्या साडींची लेस, कार्डशीट, काच, जुना आकाश कंदील, तुटलेले तोरणाच्या साह्याने विद्यार्थ्यांना राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील यांच्या संकल्पनेनुसार सहशिक्षिका उज्वला पाटील, शिक्षक शुद्दोधन इंगळे यांनी हा उपक्रम राबविला.


