Blog

जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळ चे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची उचलबांगडी 

 

दैनिक जळगाव प्रहार चे संपादक सदाशिव इंगळे यांच्या तक्रारी व पाठपुराव्याला यश..

वृषभ इंगळे 

जळगाव —

जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळ चे अधिक्षक अभियंता श्री प्रशांत पितांबर सोनवणे यांची जळगाव मंडळ येथुन उचलबांगडी करण्यात आली आहे .

सोनवणे यांच्या कामकाजा बाबत शासन स्थरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या , ची दखल घेत अखेर सार्वजनिक बांधकाम मंडळ , जळगाव अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची बदली करण्यात आली आहे , सदाशिव इंगळे दैनिक जळगाव प्रहार चे संपादक यांच्या पाठपुराव्याला यश.. मिळाले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंडळ , जळगाव अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या विभागीय चौकशी च्या अनुषंगाने व सार्वजानिक सेवेच्या हितार्थ ही बदली करण्यात आली आहे ,

आज दि १८ मार्च २०२५ च्या बदली आदेश शासन निर्णय द. व .खारके अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या सहिने आदेश काढण्यात आले आहे . त्यांना अधिक्षक अभियंता न.प प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे रिक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे . मा ,मनीषा म्हैसकर मॅडम प्रधान सचिव यांच्या कडे व मा. मुख्यअभियंता सा. बा. प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या कार्यालयात सुध्दा श्री.प्रशांत सोनवणे यांच्या बाबत अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत, त्या अनुषंगाने संबधित अधिकारी यांनी सदर तक्रारी ची दखल घेतली असावी असे वाटते.

विधानसभागृहा मध्ये सुद्धा माजी मंत्री  यांनी तारांकित प्रश्न मांडून त्यांनी विधान सभेचे त्या वेळीस लक्ष वेधले होते, परंतु त्यांच्या वर वरदहस्त असल्याने त्यांच्या वर कार्यवाही झाली नाही ,अशी जन माणसात सध्या चर्चा आहे . आता या सदर बदली आदेशाला स्थगिती मिळते का? अथवा सदर आदेश कायम ठेवला जातो. श्री. प्रशांत सोनवणे बदली आदेश थांबवण्या साठी कुठल्या जादूची कांडी वापरता या बाबत जन माणसात चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}