जामनेर तालुक्यातील – सामरोद टाकरखेड्यात सिंचन विहिरी मंजुरी करिता बोगस पंचनामे करून निधी लाटण्यात प्रयत्न..

प्रतिनिधी – वृषभ इंगळे
जामनेर तालुक्यातील
सामरोद टाकरखेड्यात सिंचन विहिरी मंजुरी करिता बोगस पंचनामे करून निधी लाटण्यात प्रयत्न..
सामरोद टाकरखेड्यात या गावा मधून सिंचन विहिरी साठी बोगस पंचनामा करून निधी लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. तलाठ्याचे बोगस पंचनामे जोडून शासनाची दिशा भुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतात विहीर असताना तलाठ्यांकडून विहीर नसल्याचा पंचनामा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पंचायत समिती च्या माध्यमातून विहिरी मंजूर करून घेतल्या. जातात एका शेतकऱ्याला सिंचन विहरी साठी 4 लाख अनुदान मिळते. पंचायत समितीच्या काही अधिकारी यांना हाताशी धरून बोगस कागद पत्रे जोडून v बोगस पंचनामे करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित प्रकार उघडकीस आल्याने इतर ही ठिकाणी असाच प्रकार घडला असावा असा संशय आहे. तरी असेच खोटे पंचनामे केलें असावे. तसेच अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी तपासणी केल्या बाबत कारवाई च्या अहवाला. बाबत संशय व्यक्त होत आहे. तरी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी तपासणी केल्या बाबत सखोल चौकशी करून संबंधित यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.



