नाशिक येथे माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न.

नाशिक येथे माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न.
नाशिक – प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा के. टी. एम. एच. कॉलेज, रावसाहेव थोरात ऑडिटोरियम, नाशिक येथे माजी राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सरकार ने ठराविक बड्या उद्योजकांना दीड लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकरयांना कर्जमाफी साठी टाळाटाळ होत असुन कर्ज माफी न केल्यास आंदोलनाची धार आधिक तीव्र करण्यात येईल, असे बच्चु कडूंनी भाषणात बोलताना सांगितले, रावसाहेब थोरात सभागृहात कार्यकर्तेंना संताजी धनाजी पुरस्कार बच्चू कडु यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला, कृषी मंत्र्यांचे कार्यपध्दती वर ही त्यांनी टिकास्त्र सोडले, दिव्यांगांना हात पाय नाहीत अशा दिव्यांगांना केवळ १५०० रुपये देतात व आमदार मंत्रींचा पगार ५५००० वरुन साडेतीन लाख केला दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल असे ही बच्चु कडू म्हणाले. यावेळी दिव्यांग विजय पाटील यांनी देशभक्ती गीता वर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी निरीक्षक महेश बढे, निलेश वाटाणे, कुणाल राऊत उपस्थित होते.
पुरस्कारार्थी – पार्श्वनाथ जाधव, संदीप सूर्यवंशी, धर्मराज पाटील, स्वाती कुमावत, समाधान बागल, हरीश कुमावत, राजेंद्र पवार, संतोष मानकर, निंबा अहिरे, प्रमोद पाटील, महेंद्र सपकाळे, मंगलचंद जैन, तुकाराम अलट, दीपक जाधव, गोपाल गावित यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, दिव्यांग जिल्हाध्यक्ष ललित पवार, चंद्रभान गांगुर्डे, सविता जाधव, बबलू मिर्झा, समाधान बागल, अमजद पठाण, नितीन गव्हाने, अमोल अडांगळे, शाहनवाज शेख, संजय तिवडे, नाना शिंदे, अनंता उपाध्ये, शाम गोसावी, शरद शिंदे, दत्तु बोडके, विलास कानकाट, दत्ता कांगणे रविंद्र टिळे, आरुण पाचोरे, अमोल फडताळे, तुषार खैरनार आदी उपस्थित होते.



