बस स्थानक वरील सर्व समस्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा…… राहुल चव्हाण (पाटील) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट
बस स्थानक वरील सर्व समस्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा...... राहुल चव्हाण (पाटील) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट

आपल्या जामनेर आगारात मोठ्या प्रमाणात चोरीच्या व आरोग्याच्या त्यासोबतच महिला संरक्षणाच्या समस्या निर्माण झालेल्या दिसून येतं आहेतं. जामनेर तालुक्यातील वाढती लोकसंख्या बघता काही गोष्टीची उपाययोजना तात्काळ करणे गरजेचे आहे.
१) पूर्ण बसस्थानक परिसरात तात्काळ CCTV यंत्रणा बसवण्यात यावे.
२) बसस्थानक वरील हिरकणी कक्ष तात्काळ आजच्या आज चालु करण्यात यावे.
३) बसस्थानक वरील महिला व पुरुष शौचालयांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
४) बसस्थानकावर शिस्त लागण्यासाठी पार्किंग चा विषय तात्काळ मार्गी लावावा.
५) बसस्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
६) बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा यासाठी मांगणी करावी.
७) पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साथीचे आजार पसरले आहेत. पूर्ण बसस्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी आगार प्रमुखांनी लक्ष घालावे.
८)बंद पडुन असलेल्या सिनेमागृहात रोड रोमिओ गुलछरे उडवत असतात,असे कानावर आलेले आहेतं काही विचित्र घटना घडल्यास त्याला जबाबदार आगार व्यवस्थापक म्हणून तुम्ही रहाल त्यामुळे,
त्याचप्रमाणे बसस्थानक चे अपूर्ण काम कधी पर्यत पूर्ण करणारं त्यासंदर्भात योग्य ती चौकशी करून 7 दिवसाच्या आत तालुक्यातील जनतेला माहिती द्यावी.
अशा स्वरूपाचे निविदेन राहुल चव्हाण पाटील यांनी दिले



