श्री. प्रशांत सोनवणे अधिक्षक अभियंता सार्वजानिक बांधकाम मंडळ जळगाव यांच्या बदली आदेशाला- दि 15/04/2025 पर्यंत स्थगिती.

सदाशिव इंगळे –
सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन आदेश क्र.बदली-१२२४/प्र.क्र.९१/सेवा-१, दि.१८.०३.२०२५. च्या शासन परिपत्रका नुसार श्री. प्रशांत सोनवणे अधिक्षक अभियंता यांना
दि 18 मार्च 2025 पासून कार्यमुक्त करण्याचे शासन परिपत्रक निर्गमित केले असताना आज दिनांक 27 मार्च 2025 च्या शासन परिपत्रका नुसार दिनांक 15/04/2025 पर्यंत प्रशासकिय कारणास्तव त्यांच्या बदली आदेशाला स्थगिती देण्याचे कारण काय असावे या बाबत जन माणसात चर्चा सुरू आहे.
श्री. प्रशांत सोनवणे अधिक्षक अभियंता सार्वजानिक बांधकाम मंडळ जळगाव यांचा हट्ट व लाड शासन कशा साठी पुरवीत आहे या बाबत जन माणसात संभ्रम निर्माण झाला आहे, प्रशांत सोनवणे यांच्या विरुध्द शासना कडे खूप तक्रारी असून सुद्धा या तक्रारी ची शासन दखल न घेता उलट बदली आदेशाला काही दिवस स्थगिती दिल्याचे दिसत आहे, स्थगिती ही देण्याचे कारण असे असावे कि ठेकेदारांचे बिले काढून व आवश्यक ते पुरावे नष्ट करुण झालेला गैर प्रकार लपवणे असे असावे का ? विभागीय चौकशी च्या अनुषंगाने त्यांची बदली झाली आहे, त्यांची बदली करायची नव्हते तर बदली आदेश का काढले, व पुन्हा काही दिवस बदली आदेशाला स्थगिती का?
त्यांच्या जागी दुसरा अधिकारी येण्यास सक्षम नाही का? भ्रष्टाचाराचे इतके आरोप होउन सुद्धा त्यांची तात्काळ बदली न करता पुन्हा बदली आदेशाला काही दिवस स्थगिती देणे हा कुठला प्रकार असावा सदर प्रकार जनतेला कळत नसून असाच प्रकार घडत असेल तर जन माणसात शासनाची प्रतीमा मलिन होईल. असे कोणते हित संबंध शासनाचे आहे की प्रशांत सोनवणे यांच्या बाबत गांभीर्याने विचार न करता त्यांच्या बदली आदेशाला पुन्हा स्थगिती दिली जात आहे,
सूत्रांच्या माहितीनुसार श्री. प्रशांत सोनवणे हे नाशिक विभागात बदली साठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
श्री. प्रशांत सोनवणे यांच्या कडे अशी कोणती जादूची कांडी आहे की त्याचा वापर करुण शासन नियमाला न जुप्ता, इच्छा होइल तिथे बदली आपली व्हावी असा डाव त्यांच्या कडून आखला जात आहे.
राज्यात श्री. प्रशांत सोनवणे हेच सक्षम अधिकारी आहे का, की त्यांच्या जागेवर अधिक्षक अभियंता या पदा वर कोणी ही विराजमान होऊ नये असा काही शासनाचा उद्देश आहे का? या प्रकारची चर्चा बघायला मिळत आहे



