जामनेर तालुक्यात कित्येक वर्षा पासुन ठाण मांडून बसलेल्या अधिकारी – कर्मचारी यांच्या बदल्या होणार कधी ? शासकीय बदल्या नियम धाब्यावर : नागरिक त्रस्त
जामनेर तालुक्यात कित्येक वर्षा पासुन ठाण मांडून बसलेल्या अधिकारी – कर्मचारी यांच्या बदल्या होणार कधी ?
शासकीय बदल्या नियम धाब्यावर : नागरिक त्रस्त
आपला पत्रकार ( मच्छिंद्र इंगळे )
जामनेर – जामनेर तालुक्यात बऱ्याच वर्षा पासुन एकाच ठिकाणी विविध विभागातील अधिकारी – कर्मचारी हे कब्जा करून बसल्याने ते खुर्ची सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे .
सर्व शासकीय बदल्यांचे नियम पायदळी तुडवण्यात येत असुन यांना आर्शीवाद आहे तरी कोणाचा असा प्रश्न विचारला जावू लागला आहे .
शासकीय नियमा प्रमाणे तिन वर्षा पेक्षा जास्त झालेल्या अधिकारी , कर्मचारी यांची बदली होणे क्रम प्राप्त आहे .
मात्र काही विभागांचा आढावा घेतला असता काहींना सहा ते दहा वर्ष होवूनही ते महाशय एकाच जागी एकाच खुर्ची वर चिटकुन बसलेले आहे .
संबंधीतांच्या बदली ऑडर काढल्या जातात , मात्र लागलीच त्या रद्द करून आणण्याची कला , हातोटी काहींनी हाताळली असल्याचे बोलले जात आहे .
एकाच ठिकाणी बरेच वर्ष झाल्याने सर्व सामान्यांशी नीट सौजन्याने वागण्यातही फरक जाणवत आहे .
काही अधिकारी यांना प्रभारी पदभार बऱ्याच वर्षा पासुन देवूनही ते सोडायला तयार नसुन या ठिकाणी कोणी येऊ च नये अशी फिल्डींग ही त्यांनी लावल्याचे विभागात कुजबुज ऐकायला मिळते . तर काहिंना वरिष्ठ पातळीवर प्रमोशन होवूनही जामनेरचा पदभार सोडायला काहींचे मन होत नसल्याचे चित्र आहे .
ग्रामीण भागातील नागरिक शहरी ठिकाणी आल्यावर अधिकारी , कर्मचारी टेबलावर सापडत नसल्याने त्यांचे वेळ पैसा वाया जावुन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .
बरेच शे अधिकारी , कर्मचारी बाहेर गावा वरून अपडावून करीत असल्याने मुख्यालयी ठिकाणी राहणे शासकीय नियम असतांना सर्रास पायदळी तुडवण्यात येत आहे .
खोटी रहिवासी पुरावे , प्रवास भत्ते दाखवून शासणाची फसवणुक सुरू असल्याचे बोलल्या जात आहे .
आमचे कोणी काही करू शकत नाही , कुणालाही सांगा अश्या गुर्मीत काही अधिकारी , कर्मचारी वागत असल्याच्या प्रातिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे .
नावालाच जवळच्या तालुक्यात पोष्टींग करायची व पुन्हा जामनेरला रुजु व्हायचे असा काहींचा फंडा सुरु झाला आहे .
मोठ्या प्रमाणात जामनेर तालुक्यात परिसरात आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर शेत , जमिनी , प्लॉट इतर संपत्ती काही अधिकारी – कर्मचारी यांनी काळ्या पैश्यातून जमवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे .
यांचा शोध घेऊन विभागीय चौकशी लावल्यास सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे .
सर्व सामान्य नागरिकांची कामे योग्य वेळेत व्हावीत यासाठी शासन अहोरात्र पर्यंत करीत आहे . मात्र काही मुजोर अधिकारी – कर्मचारी सर्व सामान्य नागरिकांना हेलपाटे घालण्यास मजबुर करीत आहे .
तरी या बाबींकडे जागृत लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे .
अन्यथा या विरोधात लवकरच सामाजिक संघटना आंदोलन करण्याचे पवित्र्यात आहे .



