तोंडापुर गावाचे ऐतिहासिक कला व स्थापत्याचे अध्ययन



संशोधक : श्री.सुभाष छगन कुंभार M.A.Bed, NET,SET (HISTORY)
ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) ग्रामपंचायत मांडवे बु. पंचायत समिति जामनेर, जि. जळगाव
प्रस्थावना :-
महाराष्ट्र ही खेड्याची भूमी आहे. महाराष्ट्रात एकूण ४३६६३ खेडी असून प्रत्येक खेड्याला एक वैशिष्ठपूर्ण ऐतिहासिक पाशर्वभूमी लाभली आहे. त्या गावांचा नावातचे त्या गावाचा इतिहास दडलेला असतो. तो तेथील त्या गावातील इतिहासाचा पाऊल खुणा प्रत्येक गावात इतिहासाच्या पाऊल खुना उमटलेल्या असतात. त्या काळाचा ओघात पुसल्या गेल्या आहेत. तर काही पुसट होत चालल्या आहेत. गावाच्या तेथील गडकिल्ले, बारव, मंदिरे, शिल्प इ. माध्यमातून आज ही जीवंत असून गावाच्या इतिहासाची साथ देतात. तर काही दंत कथेच्या माध्यमातून आजही जीवंत असून पुढील पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतात. या हेतूनेच तोंडापुर गावाचे ऐतीहासिक कला व स्थापत्याचे अध्ययन हा संशोधन विषय संशोधांसाठी निवडला आहे.
उद्दिष्ट : –
तोंडापुर गावाचे ऐतीहासिक कला व स्थापत्य नमूना समाजापुढे आणणे.
तोंडापुर गावातील ऐतीहासिक कला व स्थापत्य पुढील पिढीसाठी दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक म्हणून चिरकाल टिकून रहावा. यासाठी लेखणीच्या माध्यमातून जीवंत ठेवणे.
तोंडापुर गावाचे भौगोलिक स्थान व स्थिती :-
तोंडपूर हे गाव महाराष्ट्रातील खान्देशातील जळगाव जिल्हयातील जामनेर तालुक्यात खडकी नदीवर वसलेले आहे. तोंडापुर गाव हे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यापासून १० किमी अंतरावर पूर्वेकडे अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असून.त्यास पश्चिमेस जिल्ह्याची सीमा तर, दक्षिणेस जालना जिल्या तील भोकरदन तालुक्याची सीमा लागून आहे. तोंडापर गाव तीनही बाजूने डोंगरांनी वेढलेला आहे. अक्षवृत्तीय विस्तार २०.५७ रेखावृत्तीय विस्तार ७५.८० आहे.
तोंडापुर गावाचे ऐतीहासिक अवलोकन :-
गडा वरील अंबिका मता :- जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पासून पूर्वेस १० किमी अंतरावर तोंडापुर गांव असून,गावाजवळील गडावरील अंबिका देवीचे तोंड या गावाकडे असल्यानेच गावाला तोंडापुर हे नाव देण्यात आले अशी आख्यायिका दंत कथेतून ऐकायला मिळते.परिसरातील जागृत देवस्थान ,नवसाला पवणारी देवी म्हणून अंबिका मातेची ख्याती आहे. देवीचे मंदिर यादवकालीन हेमाडपंथी शैलीतील असून,पायापासून ते शिखरपर्यंत दगड एकात एक गुंफून मंदिर रचण्यात आले. असून,साधारणत:१२ ते १३ शतकातील हे मंदिर असून,कोरीव कलेचा उत्तम नमूना आहे.मंदिराच्या दगडावर नक्षीकाम केलेले असून,त्यावर हत्ती,विविध मूर्त्यांची प्रतीकृती कोरण्यात आलेल्या आहेत.मंदिरावरील पुजारी श्री.सांडूजी गुरव त्यांचे ९ वी पिढीपासून माता अंबिका देवीची पूजा अर्चना करण्याचा वारसा त्यांना लाभला आहे. देवीचे सत्त्व असून,बऱ्याच वर्षांपूर्वी गावात मोठा दरोडा पडला,दरोडेखोरांनी गावातील खूप द्रव ऐवज लुटून गावातून नेत असताना, अंबिका देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी आल्यावर त्या लुटारुना पुढे काहीच दिसंत नव्हते. शेवटी त्यांनी सोबत घेतलेले द्रव्य ऐवज गावाच्या वेशीतच टाकून पसार झाले.तसेच गावचे महापूर,चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटा पासून देखील गावाचे संरक्षण झाले असल्याबाबत ग्रामस्थ सांगतात.
अंबिका माता गडावर १०१ पायऱ्या असून, नवरात्री महोत्सवात परिसर रोशनाईने उजळून निघतो. अंबा भवानी माता हे जागृत देवस्थान असल्याने गावा मध्ये कोणी ही देवीची इतर ठिकाणी स्थापना कर नाहीत सर्व जाती धर्माचे लोक अंबा भवानी माता मंदिरावर नवरात्र उत्साहात सहभागी होतात त्या मूळ या गावात भक्तिमय वातावरण बघायला मिळत. हे या गावाचं एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. नवस व यात्रा उत्सवाचे आयोजन केले जाते. गावातील प्रत्येक घरातील नोकरी निमित बाहेरगावी गेलेले चाकरमानी तसेच माहेर वाशीनी चैत्रीय पौर्णिमा यात्रा उत्सवाला
जातीने हजर राहत.
बारव:- तोंडापुर गावात यादव कालीन हेमाडपंथी शैलीतील बारव प्रसिद्ध असून,तिला पुष्कर बारव म्हणून ओळखले जाते. साधारणत; १२व्या शतकातील असून,त्याकाळात पाणी साठा व्हावा. यासाठी बनविण्यात आलेली असून, बारवेस ३ बाजूने प्रवेशद्वार असून ९ देवतांचे मंदिरे असून,नवग्रह मंदिर असावीत.अतिक्रमानचा विळखा व मानवी उपद्रवणे बारव आपले अस्तित्व संपवू पाहते. आताच्या काळात काही सुज्ञ ग्रामस्थानी पुढाकार घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून बारवाची साफसफाई करून घेतली. असाच आपल्या इतिहासाचा ठेवा जातं करणे काळजी गरज आहे.
तोंडापुर येथील किल्ला :- सदर किल्ल्याचे उल्लेख तोंडापुर गावाच्या मधोमध एका छोट्या टेकडीवर सुमारे दीड एकर पसरलेला आहे. सदर किल्ला मोठ्या प्रमाणावर उदध्वस्त झाला आहे. वाढत्या वस्तीने गिळंकृत केला आहे. किल्ल्याचे अवशेष अनेक ठिकाणी विखुरलेली आहे. तटबंदी उदध्वस्त झालेला आहे. सदर किल्याचा उल्लेख प्रो.प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गड आणि किल्ले या एकमेव पुस्तकात तोंडापुर किल्ल्याची नोंद आढळून येते.
निष्कर्ष:- आपल्या महाराष्ट्र भूमीतहीन इतिहासच्या पाऊल खुणा कला व स्थापत्याचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे. आज आपण त्याचे जतन व संवर्धन केले नाही. तर इतिहास वा आपल्या गढकलीन पिढी आपल्याला कधीच माफ करू शकणार नाही. पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन म्हणून लोकांना प्राचीन कला व स्थापत्यचे जतन व संवर्धन करणे कामी समाजात जागृत होणे आवश्यक आहे.
संदर्भ ग्रंथ:-
1)http://www.census.2011
2)प्रो. प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गड व किल्ले पुस्तक
3)अंबिका, माता, बावर, फोटो
4)अंबिका माता मंदिर पुजारी श्री सांडूजी गुरव यांची मुलाखत
5)ग्रामपंचायत अधिकारी श्री.डी.डी.आहेर यांची मुलाखत (तोंडापुर)
ग्रामपंचायत अधिकारी श्री. ए. डी. वंजारी यांची मुलाखत (ग्रामपंचायत तोंडापुर)



