दिलीप खोडपे यांचा २१ सप्टेबरला जामनेरात रा कॉ शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश भाजपाला धक्का

दिलीप खोडपे यांचा २१ सप्टेबरला जामनेरात रा कॉ शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
भाजपाला धक्का
जळगाव प्रहार वृषभ इंगळे
जामनेर — भाजपाला अखेर सोडचिठ्ठी देवून दिलीप खोडपे शरदपवार यांच्या रा कॉ पक्षात येत्या २१ सप्टेबर रोजी जामनेरात प्रवेश करीत आहेत .
बोहरा मंगल कार्यालय येथे शनिवार रोजी जामनेरात राकॉ शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा कार्यक्रम होत आहे .
या कार्यक्रमात शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , व इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा निश्चित झाला आहे .
भाजपात होणारी नेहमीची घुसमट , नेत्यांच्या मनात माझ्या बाबत निर्माण करण्यात आलेली निगेटीव्ह प्रतिमा , या ला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे दिलीप खोडपे यांच्या प्रतिक्रिया आहे .
त्यांनी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देवून आपल्या व्यथा त्यात सविस्तर मांडल्या आहेत .
रा कॉ शरदपवार गटाचे स्थानिक नेते दिलीप खोडपे यांनी आपल्या गटात यावे यासाठी सतत संपर्क करून पर्यनात होते .
अखेर भाजपाचा जेष्ठ नेता , मुरब्बी चेहरा फोडण्यात त्यांना यश आले आहे .
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत भाजपा समोर कडवे आव्हान असणार आहे .
दिलीप खोडपे यांचा राकॉ शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होत असल्याने व त्यांची आमदार की साठी उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने जामनेर तालुक्याचे राजकीय समिकरण बदलणार आहे .



