धुळे व नंदुरबार जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेकडून खातेदार स्व. गिरीश गावीत यांच्या वारसास २० हजाराचा धनादेश वाटप

धुळे व नंदुरबार जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेकडून खातेदार स्व. गिरीश गावीत यांच्या वारसास २० हजाराचा धनादेश वाटप
नंदुरबार दि. २५ धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी पतपेढीचे खातेदार असलेले सभासद स्व.गिरीश साकऱ्या गावित प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठली केंद्र मोलगी तालुका अक्कलकुवा येथे कार्यरत शिक्षक यांचे अचानक हृदयविकाराचा तीव्र झटक्याने दिनांक १८ जून २०२५ रोजी निधन झाले. त्यांचे नंदुरबार जिल्हा शिक्षक सहकारी पतपेढीचे सभासद होते व त्यांना संस्थेच्या वतीने तातडीची मदत म्हणून २० हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या राहत्या घरी के. आर. सनसिटी, नवापूर रोड नंदुरबार येथे धनादेश चेक महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांच्या हस्ते त्यांच्या पश्चात धनादेश त्यांच्या कुटुंबिय गिरीश गावित यांची पत्नी राजमेरी गावित, मुलगा अभिषेक गावित, कन्या सुवर्णा वळवी, कन्या ऐश्वर्या गावित यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी धुळे व नंदुरबार जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक पुरुषोत्तम (अण्णासाहेब) काळे यांनी कुटुंबाला पेन्शन व इतर विमा योजना, कै. नानासाहेब मुरलीधर शिंदे मृत्यू फंड योजना बाबत माहिती दिली. तसेच कागदपत्र जमा झाल्यानंतरच उर्वरित रक्कम पतसंस्थेकडून लवकरच निधी कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी संचालक राजू चौरे यांनी आज जी स्व. गिरीष गावीत यांच्या कुटुंबावर वेळ आली आहे, ती कोणावरही येऊ नये. सध्या धावपळीच्या जीवनात कोणाचेही काहीही सांगता येत नाही. हे कोरोनाने सर्वांना शिकवले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होणार याची चिंता भेडसावत असते. त्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभासद असेल तरच आपल्यानंतरही आपल्या कुटुंबास आपण मदत करू शकतो. भविष्यात कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास मदत करण्यात येईल असेही मत व्यक्त केले. यावेळी स्व.गिरीश गावित सर यांच्या शाळेतील सहशिक्षक गुलाब पाटील, लोकहिताय शिक्षक गटाचे सच्चे कार्यकर्ते रामकृष्ण बागल, पतसंस्थेचे सभासद हेमंत नाईक, अविनाश गावित, मनीष वसावे, ईश्वर गावित, गणेश पाटील आदी उपस्थित होते.



