जामनेर गटशिक्षणाधिकारी पदी श्री विष्णू काळे साहेब

जामनेर गटशिक्षणाधिकारी पदी श्री विष्णू काळे
आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे
जामनेर — गटशिक्षणाधिकारी पं.स जामनेर या पदाचा अतिरिक्त प्रभार श्री विष्णू विठ्ठलराव काळे यांचे कडे सोपविण्यात आला आहे .
याबाबत नुकतेच मिनल करनवाल (भा प्र से ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी तसे आदेश काढले आहे .
श्री रामकृष्ण लोहार यांची अधिक्षक वे , व , भ, नि, पथक (माध्य) धुळे या पदावर बदली करण्यात आली आहे .
त्यामुळे यांचा कार्यभार श्री काळे यांचेकडे देण्यात आला आहे .
बुद्धीमान व्यक्तीमत्व , बोलणे अतिशय कमी आणि काम मात्र करण्याची हातोटी पर्वता सारखी , अतिशय शांत पण प्रसिद्धी पासुन पूर्णताः दूर कामाचा झपाटा तरुणांना सुद्धा त्ताजवणारा , काम वेळेत पूर्ण करण्याची जिद्द , कार्यक्षमपणा अशी श्री विष्णू काळे यांची काम करण्याची हातोटी असल्याचे सांगण्यात येते .
त्यांचेकडे आता गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार दिल्याने शिक्षण विभागातील रेंगाळलेली कामे , अनेकांच्या तक्रारी , अडी अडचणी नक्कीच दुर होतील अशी अपेक्षा त्यांचेकडून केली जात आहे .
श्री काळे हे सिल्लोड ता . जि.छत्रपतीसंभाजी नगर येथील मुळ रहिवासी आहेत .
पुढील वाटचालीस त्यांना आपला पत्रकार व दैनिक जळगाव प्रहार कडून खूप खूप शुभेच्छा .



