Blog
निवडणूकीत सर्वांनी एकजुटीने ध्येयाने काम करा – नामदार . गिरीश भाऊ महाजन
निवडणूकीत सर्वांनी एकजुटीने ध्येयाने काम करा – नामदार . गिरीश भाऊ महाजन
जळगाव प्रहार
जामनेर – विधानसभा मतदारसंघातील लोहारा-कुऱ्हाड-गोराडखेडा गट व नेरी दिगर – पळासखेडा गटातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ‘भाजपा निर्धार मेळावा’ संपन्न झाला.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने व एक ध्येयाने कार्य करावे असे आवाहन केले. आपला विकासाचा हेतू पवित्र असल्याने आपला विजय निश्चित आहे हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


