ग्रामीण
फत्तेपूर (ता.जामनेर) येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी शिबिर तसेच गृह उपयोगी साहित्य संच (भांडे वाटप) योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

जामनेर — वृषभ इंगळे
फत्तेपूर (ता.जामनेर) येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी शिबिर तसेच गृह उपयोगी साहित्य संच (भांडे वाटप) योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नोंदणी शिबिरास महिला भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून माता भगिनींचे मिळणारे आशीर्वाद महायुतीला बळ देणारे आहेत अशी भावना यावेळी नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.