Blog

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते बचत गटातील महिलांना भारतीय संविधानाची उद्देशिका व ‘महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय’ पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले.

 

 

जळगाव – 

 

 

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या औचित्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रोबेशनरी ऑफिसर वृषाली चौरे यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून अधिकारी पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडत महिलांना आत्मविश्वासाचा संदेश दिला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगावचे धीरज श्रीनिवास पाटील यांनी ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची सविस्तर माहिती देत कर्ज प्रक्रियेतील सुलभता स्पष्ट केली. ‘बँक सखी’ रंजना सोनवणे यांनी आपल्या अनुभवातून महिलांना होणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक ल. गो. तावडे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व नवउद्योगांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते बचत गटातील महिलांना भारतीय संविधानाची उद्देशिका व ‘महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय’ पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. महिलांची केवळ आर्थिक नव्हे तर वैचारिक प्रगती व्हावी, हा या उपक्रमामागील उदात्त हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. “महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज असून, समाज कल्याण विभाग त्यासाठी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन करून ‘मर्जिन मनी’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांनी शिलाई, खानावळ, शेतीपूरक व्यवसाय व लघुउद्योगांच्या माध्यमातून साधलेली प्रगती मांडली. स्वावलंबनाच्या वाटेवर आत्मविश्वासाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विशेष अधिकारी समाज कल्याण अमोल कुलकर्णी, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी विशाल राठोड, कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे , वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अजय ठाकूर यांचेसह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}