भरडू आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या कबड्डी संघाची विभागीय स्तरावर निवड

भरडू आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या कबड्डी संघाची विभागीय स्तरावर निवड
अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय भरडू ता.नवापूर जि.नंदुरबार येथील विद्यार्थी १९ वर्षे वयोगट मुली व १७ ते १९ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने शासकीय आश्रमशाळा धनराट येथे झालेल्या नंदुरबार जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून नंदुरबार जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक रितेश गावीत, अमृत नाईक यांचे संस्था अध्यक्ष माजी मंत्री सुरुपसिंगजी नाईक, उपाध्यक्ष हरीषभाई अग्रवाल, कार्याध्यक्ष तथा आमदार शिरीषकुमार नाईक, मानद सचिव तानाजीराव वळवी, अजित नाईक, कोषाध्यक्ष अरिफभाई बलेसरीया, सहसचिव दिपक नाईक, अजय पाटील, प्राचार्य महेंद्र वळवी व मुख्याध्यापक जितेंद्र कुवर यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



