ग्रामीण

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शिंदे केंद्रातील शाळांची “बॉम्बे सर्कस” ची मेजवानी

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शिंदे केंद्रातील शाळांची “बॉम्बे सर्कस” ची मेजवानी

नंदुरबार दि.१३ ( प्रतिनिधी ) “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा..” खरोखरंच या उक्ती प्रमाणे आज सर्वच लहान, पण मोठे ही लहानच झाले होते व आपल्या बालपणीची सर्कस पाहिलेल्या आठवणी ताज्या करत प्रत्यक्ष पाहून सुखावून गेले. सर्कस म्हणजे आनंद देणारा खेळ आहे असे सांगून, हा खेळ बघताना जसा आनंद मिळतो तसेच ह्या खेळात ‘बॅलेन्स’ म्हणजेच समतोल कसा साधला पाहिजे हे शिकणे फार महत्वाचे आहे असे सांगून शिंदे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मनोज पवार यांनी आपले मत व्यक्त केले. कोणत्याही एका व्यक्तीमुळे खेळ खेळता येत नाही तर त्यासाठी समूह सहकार्य असणे फार गरजेचे असते हे दिसून आले असे मुख्याध्यापक अनिल माळी यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील साहेब यांच्या प्रेरणेने आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री जयंत चौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व शिंदे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मनोज पवार सर यांच्या सोबतीने आज आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शिंदे केंद्रातील जिल्हा परिषद शाळा वरूळ जिल्हा परिषद शाळा दहिंदुले तसेच जिल्हा परिषद शाळा सुजालपूर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांच्या संमतीने आज नंदुरबार येथे बॉम्बे सर्कस या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष सर्कस बघण्याचा आनंद घेतला सर्कशीतील काम करणाऱ्या कलाकारांशी चर्चा करून त्यांचे जीवन या विषयी माहिती मिळवून घेतली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजय ठाकरे व सदस्य, माता पालक संघ,सदर उपक्रमात केंद्रप्रमुख श्री मनोज पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली

श्री अरुण पवार सर ,श्री परमार सर, श्री जाधव सर ,श्री माळी सर, श्री रमेश पावरा सर ,श्रीमती मीनाक्षी शिरसाठ मॅडम, श्रीमती रेखा मोरे मॅडम, श्रीमती पवार मॅडम तसेच सर्व शाळांचे शालेय पोषण आहार मदतनीस, प्रतिनिधी या सर्वांनी यासाठी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}