Blog
मनिष पाडळसे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

मनिष पाडळसे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
जळगाव प्रहार
जामनेर –ग्रामीण भागाच्या विकासासाठी उत्तम काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामसेवक_पुरस्कार गारखेडा बु ता.जामनेर येथील ग्रामसेवक मनिष_रामचंद्र_पाडळसे यांना देण्यात आला .
यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



