Blog

महाशिवरात्रीनिमित्त जामनेरमध्ये भव्य लेझर अ‍ॅण्ड वॉटर स्क्रीन शोचे लोकार्पण

 

 

 

महाशिवरात्रीनिमित्त जामनेरमध्ये भव्य लेझर अ‍ॅण्ड वॉटर स्क्रीन शोचे लोकार्पण

जामनेर | प्रतिनिधी  वृषभ इंगळे 

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त जामनेर नगरपरिषद यांच्या वतीने सोनबर्डी टेकडी येथे भव्य लेझर अ‍ॅण्ड वॉटर स्क्रीन प्रोजेक्शन शोचे लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत साकारलेला हा अत्याधुनिक, आकर्षक व अद्ययावत लेझर शो जामनेर शहराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या भव्य लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन गिरीषभाऊ महाजन, मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधनाताई गिरीष महाजन, नगराध्यक्षा, जामनेर नगरपरिषद या असणार आहेत.

हा कार्यक्रम रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता जामनेर येथील सोनबर्डी टेकडीवर (जि. जळगाव) आयोजित करण्यात आला आहे. लेझर व वॉटर स्क्रीनच्या माध्यमातून सादर होणारा हा शो पर्यटकांसाठी नवा अनुभव देणारा ठरणार असून, जामनेरच्या पर्यटन नकाशावर नवे आकर्षण निर्माण करणार आहे.

या सोहळ्यासाठी मा. उपाध्यक्ष, मा. गटनेते, मा. सभापती, नगरसेवक-नगरसेविका, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार बांधव-भगिनी तसेच जामनेरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जामनेर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी श्री. नितीन भगवान बागुल यांच्यासह जामनेर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. पर्यटन विकासाच्या या नव्या अध्यायाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}