मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त जामनेरात रक्तदान शिबीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त जामनेरात रक्तदान शिबीर
जामनेर -( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहर आणि पूर्व मंडळ आयोजित महारक्तदान शिबिराला नगराध्यक्षा साधना महाजन यांनी भेट दिली.
यावेळी , भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर ,जितेंद्र पाटील, अतिश झाल्टे, डॉ. प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, निलेश चव्हाण, सुहास पाटील, जामनेर शहर मंडळ अध्यक्ष रवींद्र झाल्टे, तसेच जामनेर पूर्व मंडळ अध्यक्ष मयुर पाटील, भाईदास चव्हाण, तुषार चौधरी, शुभम माळी, पप्पू पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चंद्रकांत बाविस्कर यांनी स्वतः रक्तदान केले, यावेळी याचा विशेष आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले .
या उपक्रमात जामनेर शहर व जामनेर पूर्व मंडळाच्या वतीने ३०० बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

