शहरी

मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी पदी श्री बाळकृष्ण ढंगारे 

 

मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी पदी श्री बाळकृष्ण ढंगारे

जळगाव प्रहार – संपादक सदाशिव इंगळे

जळगाव — जळगाव मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी पदाचा प्रभारी पदभार श्री बाळकृष्ण ढंगारे यांचेकडे सोपवण्यात आला आहे .

त्यांनी नुकताच या पदाचा पदभार हाती घेतला आहे .

वाशिम जिल्हातील मानोरा येथील ते रहिवासी आहेत .

जिल्हा परिषद मध्ये २८ वर्ष त्यांनी शाखा अभियंता म्हणून सुरगाना , दिंडोरी , येथे काम केले असून त्यांची पदोन्नती होवून चोपडा येथे उपविभागीय जलसंधारण म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे .

आता त्यांचेकडे प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे .

कार्यक्षम , सक्षम अधिकारी व मनमिळावू म्हणून त्यांची विभागात ओळख आहे .

त्यांचेकडे प्रभारी जिल्हा जलसंधारण विभागाचा पदभार आल्याने विभागातील प्रलंबीत प्रश्न , योजना मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}