Blog

संकल्प जामनेरच्या सर्वांगीण विकासाचा… संकल्प हा महाविजयाचा– नामदार गिरीश महाजन 

संकल्प जामनेरच्या सर्वांगीण विकासाचा…

संकल्प हा महाविजयाचा– नामदार गिरीश महाजन

जळगाव प्रहार  -वृषभ इंगळे

जामनेर – विधानसभा मतदारसंघातून आज भाजप पक्षाच्या वतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी दाखल केला.

पाचोरा रोड वरील बाबाजी राघो मंगल कार्यालय येथुन रॅली काढण्यात आली .

यावेळी भाजपा केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे , नगराध्यक्षा साधना महाजन , स्मिता वाघ , आ राजू मामा भोळे , संजय गरुड , डॉ सागर गरुड यांचे सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सातव्यांदा मला पक्षाने संधी दिली असुन पक्षाचा आभारी असल्याचे नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले . जामनेर शहरासह

तालुक्यात करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा मला विजयी करून सेवा करण्याची संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

विरोधकांकडे उमेदवार नव्हता कोणी उभ राहायला तयार नव्हते , आमच्यातील एक व्यक्ती फोडला उमेदवारी दिली .

आणि तोच व्यक्ती आज आम्ही काय विकास केला हे प्रश्न आम्हाला विचारत आहे .

घोडा मैदान जवळ आहे , जनता यांना यांची जागा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}