राजेंद्र पाटील यांचा नातू चि. लक्षदिप यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. काथर्दे दिगर शाळेत विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटप.

राजेंद्र पाटील यांचा नातू चि. लक्षदिप यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. काथर्दे दिगर शाळेत विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटप.
नंदुरबार दि. २१ (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांच्या नातूच्या वाढदिवसानिमित्त काथर्दे दिगर शाळेतील सर्व मुलांना ट्रॅक सुट चे वाटप करण्याचे संकल्प करित जि.प.शाळा काथर्दे दिगर केंद्र परिवर्धा ता.शहादा येथील मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर यांनी त्यांचा नातू चि. लक्षदिप यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा काथर्दे दिगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत ट्रॅक सूट ( t-shirt आणि पँट) वाटप केले. सदर कार्यक्रमाला आमच्या शहादा नं. 1 बीटाचे चे शिक्षण विस्तार अधिकारी तथा धडगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डी. डी. राजपूत, काथर्दे दिगर गावाचे सरपंच कमाबाई भिल, उपसरपंच गुलाबसिंग गिरासे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे , सहशिक्षक ज्ञानोबा सुरनर , सहशिक्षक शक्ती धनके,काथर्दे खु .शाळेचे शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटना शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, जि.प.शाळा काथर्दे दिगर चे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील , केंद्रप्रमुख खर्डे , सहशिक्षक शेजोळे उपस्थित होते.
जि.प.शाळा काथर्दे दिगर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी त्यांचा नातूचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक मदत करून साजरा करण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी.राजपूत यांनी राजेंद्र पाटील यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले तसेच शिक्षण विभाग शहादा गटशिक्षण अधिकारी डॉ. योगेश सावळे यांनी अभिनंदन व्यक्त केले.



