राजेश मोरे यांनी स्वीकारला मुख्य अभियंता पदाचा पदभार
दैनिक जळगाव प्रहार चे संपादक सदाशिव इंगळे यांच्याकडून शुभेच्छा

जळगाव – तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार श्री. राजेश मुरलीधर मोरे यांनी आज विधिवत स्वीकारला. राज्याच्या जलसंपदा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या महामंडळात अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
जलव्यवस्थापन, प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणी या सर्वच पातळ्यांवर कार्यक्षम नेतृत्वाची गरज पूर्ण करणारे अधिकारी म्हणून श्री. मोरे यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी विविध पदांवर कार्यरत राहून जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
या निमित्ताने संपादक सदाशिव इंगळे यांनी शुभेच्छा देत सांगितले की,
“श्री. मोरे यांच्या नेतृत्वामुळे तापी पाटबंधारे क्षेत्रात नवे विकासदृष्टीकोन निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलप्रकल्पांचा वेग वाढेल, असा विश्वास आहे.”
जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर वेगात काम करण्याचा त्यांचा दृष्टीकोन भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास स्थानिक जनप्रतिनिधी, अभियांत्रिकी क्षेत्रातील सहकारी व नागरिकांनीही व्यक्त केला आहे.


