लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता श्री. भोसले साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा – संपादक सदाशिव इंगळे दैनिक जळगाव प्रहार

जळगाव :
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव येथील अधीक्षक अभियंता श्री. भोसले साहेब यांचा वाढदिवस आज साजरा होत असून, या निमित्ताने दैनिक जळगाव प्रहारचे संपादक श्री. सदाशिव इंगळे यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
शिस्तप्रिय, काटेकोर व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले श्री. भोसले साहेब यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणात पदभार स्वीकारल्यापासून प्रलंबित कामांना वेग मिळाला असून, नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे विकासकामे जलद गतीने पूर्ण होत आहेत.
कार्यालयीन शिस्त, वेळेत निर्णय प्रक्रिया, तसेच गुणवत्तापूर्ण कामावर त्यांचा विशेष भर असून, त्यांच्या नेतृत्वामुळे विभागातील अधिकारी व कर्मचारी अधिक जबाबदारीने काम करीत आहेत. परिणामी शेतकरी व लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा कर्तव्यदक्ष व लोकहितैषी अधिकाऱ्यांना वाढदिवसानिमित्त दैनिक जळगाव प्रहार परिवाराकडून पुढील वाटचालीस आरोग्य, यश व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.



