नवापूर येथे लोकनेते स्व. माणिकराव गावित स्मृतिस्थळावर अभिवादन कार्यक्रम विसरवाडी : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री लोकनेते माणिकराव गावित यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नवापूर येथील सुमाणिक फार्म हाऊस येथील स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण करण्यात आली.

नवापूर येथे लोकनेते स्व. माणिकराव गावित स्मृतिस्थळावर अभिवादन कार्यक्रम विसरवाडी : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री लोकनेते माणिकराव गावित यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नवापूर येथील सुमाणिक फार्म हाऊस येथील स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
सुमाणिक फार्महाउसवर स्मृतीस्थळी सामुदायिक श्रद्धांजली अर्पणाचा व अभिवादनाचा कार्यक्रम मंगळवार दि. १७ रोजी झाला. या वेळी इगतपुरी मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश गावित, विसरवाडी येथील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री गावित, अनिल वसावे, नीता वसावे, सुहास नटावदकर, सुहासिनी नटावदकर, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, पुष्पा गावित, सुमित्रा गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, पंचायत समिती सदस्य अमरसिंग गावित, डोकारे साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक जयवंत जाधव, विसरवाडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए. टी. पाटील, उपप्राचार्य प्रा. बाबू गावित, मुख्याध्यापक दिनेश बिरारीस, दिलीप गावित, रामकृष्ण सोनवणे, रघुवेल मावची, अर्चना बिरारी, दिनेश आहिरराव, हेमंत जाधव, अजय गावित, संतोष गावित, डॉ. राहुल ठाकूर, डॉ. विशाल करपे, किशोर वसावे, शरद चौधरी, संजय गावित,प्रदीप गावीत आदींसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सरपंच, सदस्य, माणिकरावजी विद्याप्रसारक संस्था संचलित सुमाणिक प्राथमिक विद्यालय, नवापूर, पांघराण येथील स्वर्गीय हेमलताताई अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कारेघाट येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, माणिकरावजी गावित नागरी सहकारी पतसंस्था, स्वर्गीय हेमलताताई वळवी सहकारी ग्राहक भांडार या विविध शाखाचे अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, नवापूर तालुक्यातील विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



