Blog
वाघुर उपसा सिंचन क्रमांक १ अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या शेततळ्यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केली पाहणी

वाघुर उपसा सिंचन क्रमांक १ अंतर्गत तयार
करण्यात येणाऱ्या शेततळ्यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केली पाहणी
जळगाव प्रहार – वृषभ इंगळे –
जामनेर तालुक्यातील करमाड व नेरी परिसरातील ‘वाघूर उपसा शेततळ्यांची सिंचन क्रमांक १’ अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या शेततळ्यांची पाहणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन उपस्थित होते.
या शेततळ्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना अधिक सिंचनाची सुविधा मिळणार असून, कृषी उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचे प्रतिक्रिया नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी यावेळी दिल्या .



