नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये ‘बदली’वरुन गोंधळ; अनेकजण पदाला चिटकून बसल्याने प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल सीईओ सावनकुमार यांचा मोठा निर्णय.

नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये ‘बदली’वरुन गोंधळ; अनेकजण पदाला चिटकून बसल्याने प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल सीईओ सावनकुमार यांचा मोठा निर्णय.
नंदुरबार दि. १५ महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गोपाल गावीत यांनी जिल्हा परिषद मध्ये अधिक वर्षानुवर्षे एकाच टेबलवर नियुक्ती असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करण्यासंदर्भात निवेदन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांना निवेदनाद्वारे देण्यात आले होते. जि. प.नंदुरबार मुख्य कार्यकारी सावनकुमार यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश शुक्रवार दि.१३ जून रोजी दिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात न येता कर्तव्यदक्ष अधिकारी सीईओ सावनकुमार यांनी मोठा धाडसी निर्णय घेऊन शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्यामुळे झेडपीत कर्मचाऱ्यांची गर्दी फुलली होती. शिक्षण विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांना पदावरून दुसऱ्या ठिकाणी कार्यमुक्त करावे, अशा मागणीचा निवेदनात केला होता. सीईओ यांनी यांची बदलीचे आदेश देत पाणीपुरवठा विभागात नियुक्ती सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून सुभाष मारणार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या आदेशानुसार मे महिन्यात ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या होत्या. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केला होता. शिक्षण विभाग मधील कालावधी जास्त झालेला असतानाही कमी दाखवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे अनेक कर्मचाऱ्यांच्याबाबतीत घडले आहे. बदलीतून सुटका करून घेण्यासाठी नियमाचा आधार घेत असे अनेकजण पदाला चिटकून बसले असल्याचे सांगितले जात होते.
जिल्हा परिषदेत घडलेल्या अनेक प्रकारातूनच जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी या ठिकाणावरून विराजमान पदी वर्णी कोणाच्या शुभ आशीर्वादाने वर्षानुवर्षे एकाच टेबलला खुर्चीवर असल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी सुभाष मारनार १४ वर्षापासून एकाच खुर्चीवर चिपकून बसले होते. अनेक आरोप होत होते. प्रशासनाने सदर रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा का केला नाही? याचाही खुलासा सीईओ सावनकुमार हे संघटनेसमोर खुलासा देतील का प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मागील वर्षात जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये जि. प. सदस्य यांनी याहा मोगी माता सभागृहात चर्चेत केलेला मुद्दा वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनार त्यावेळीच बदली करावी यासाठी चर्चेत ठरले होते. शिक्षण विभागावर नजर शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. अधिकारी रिक्त पदाची मागणी करून ही कर्मचारी दिले जात नाहीत. या विभागाला नवे कर्मचारी देण्यास खोडा घातला जात आहे. असा प्रकार कोण करत आहे तसेच या विभागात काम करणाऱ्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांना वरदहस्त कोणाचा? हाही विषय संशोधनाचा झाला आहे. वादग्रस्त कर्मचाऱ्यांशी लांगेबांदे कोणाचे आहेत, वरिष्ठांच्या नावाने “कुबेर लक्ष्मी’ दर्शनाचा आधार घेणाऱ्याचा सीईओ सावनकुमार यांनी बंदोबस्त करावा नाही तर भविष्यात अडचणी वाढणार आहेत, असे समस्त नागरिक, कर्मचाऱ्यांमध्ये खुलेपणाने बोलले जात होते.
सीईओ सावनकुमार यांनी आपल्या कार्याची झलक दाखवत पाच वर्षापासून अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी मोहीम हाती घेतील का? वरिष्ठांच्या आदेशाची केराची टोपली दाखवणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभाग वरिष्ठ सहाय्यक अधिकारी यांची दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत सिईओ कारवाई करतील का? या मोहिमेची सुरुवात त्यांनी शिक्षण विभागातील १३ ते १४ वर्षापासून एकाच खुर्चीवर चिपकून बसलेले यांच्यासाठी शासनाचा आदेश वेगळा आहेत का? वरिष्ठ प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांच्यापासून सुरवात करावी याही चर्चेला जोर धरला होता. प्रहार शिक्षक संघटनेच्या तक्रारीचे निवारण दखल घेऊन धाडसी निर्णया बद्दल जि. प. नंदुरबार सीईओ सावनकुमार यांचे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी अभिनंदन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाडी, वस्ती, पाड्यातील शिक्षक बांधव यांनी प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आहे.



