Blog

नवापूर तालुक्यातील सोनारे दिगर येथे शिक्षण परिषद संपन्न

नवापूर तालुक्यातील सोनारे दिगर येथे शिक्षण परिषद संपन्न

नंदुरबार दि.२९ नवापूर तालुक्यातील सोनारे दिगर येथे अंजने व चिंचपाडा केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद २७ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन नवापूर पंचायत समिती सभापती बबिताताई नरेंद्र गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण परिषदेला पंचायत समिती शिक्षण विभाग नवापूर गटशिक्षणाधिकारी रमेश चौधरी चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले,शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख चिंचपाडा राकेश देसले, अंजने केंद्रप्रमुख योगेश महाले, सोनारे दिगर ग्रामपंचायतचे सरपंच विनायक वसावे तसेच प्रायोजक शाळा सोनारे दिगर येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रिया वळवी, महालकडू येथील देवीलाल वळवी, बिलदे येथील श्रीराम नाईक केलपाडा येथील गंगाराम गावीत, श्रावणी केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय अर्थतज्ञ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते आई देवमोगरा माता, सरस्वती माता, धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सोनारे दिगर येथील चिमुकल्या मुलींनी सुंदर असे कृतीयुक्त ईश्स्तवन व स्वागत गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आदिवासी जीवन संस्कृतीवर आधारित जिवंत देखावा सह सुंदर असं नृत्य गीत सादर केले. सर्व उपस्थित मंडळींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी प्रशासकीय विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले यांनी आपल्या विशेष शैलीत मार्गदर्शन केले. शाळा, विद्यार्थी तथा शाळेतील शिक्षक यांचे तोंड भरून कौतुक केले. अपार आयडी, क्रीडा स्पर्धा, नवभारत साक्षरता अभियान, ड्रॉप बॉक्स विद्यार्थी, शालेय पोषण आहार, आरोग्य तपासणी, परसबाग, स्वच्छता इत्यादी बाबीवर प्रकाश टाकला. मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे यांनी अभ्यासपूर्ण प्रशासकीय विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर केंद्रप्रमुख योगेश महाले व राकेश देसले यांनी जिल्हास्तर वरून देण्यात आलेली सर्व विषय हाताळले.

सूत्रसंचालन रजेसिंग गावित यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनारे दिगर शाळेचे मुख्याध्यापिका सरिता वळवी व उपशिक्षक प्रमोद वसावे, बिलदे शाळेचे मुख्याध्यापक रजेसिंग गावीत, उपशिक्षक गोंड्या पाडवी, महालकडू शाळेचे मुख्याध्यापक मोना वसावे उपशिक्षक शैलेश गावीत, केलपाडा शाळेचे मुख्याध्यापक पावरा सर, उपशिक्षक राजु राऊत, हंना वळवी, संगिता वसावे, कमलेश वळवी यांनी परिश्रम घेतले. कौशल्य विकास अंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}