शहादा तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा मंदाना येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

- शहादा तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा मंदाना येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा
नंदुरबार दि.९ (प्रतिनिधी) हिंदुस्थानाचे स्वातंत्र्यासाठी क्रांतिवीरांनी रणवीरांनी आपले रक्त शिंपले त्या रक्ताची किंमत कळावी, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्यासाठी अनेक आदिवासी क्रांतिवीरक जननायक बिरसा मुंडा, क्रांतिवीर तंट्या मामा भील, क्रांतिवीर राघोजी भांगरे, क्रांतिवीर ख्वाजा नाईक, वीर बाबुराव शेडमाके, क्रांतिवीर तिलका मांझी, रानी दुर्गावती, क्रांतिवीर नाग्या महादु कातकरी, रानी गाइदिनल्यू, क्रांतिवीर सिद्धू संथाल, क्रांतिवीर टंट्या भिल्ल, कोमारम भीम, बिरजू नायक यांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यसंग्रामात शहीद झालेल्या वीरगती प्राप्त झालेल्या आदिवासी हुतात्म्या बांधव क्रांतीकारकांच्या प्राणाची रक्ताची किंमत या देशाला, विद्यार्थ्यांना कळावी यासाठी भित्तिपत्रकाचे कार्यक्रम शाळेत घेतले. आदिवासी म्हणजे या भुतलावर आधीपासून अधीवास करणारे, निसर्गाची पूजा करणारे, निसर्गाला सोबत घेऊन चालणारे, निसर्गप्रमाणेच कोणासोबात कसलाही भेदभाव न करणारे.
शहादा तालुक्यातील जि. प. शाळा मंदाणेच्या विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती बद्दल माहिती मिळावी, त्या संस्कृतीत जन्मलेले महान क्रांतिकारी बिरसा मुंडा, खाज्या नाईक, तंट्या भील, राणा पुंजा अशा जननायकांची आपण पूजा का करतो? आदिवासी दिन साजरा का करतो? याची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून जि. प. शाळा मंदाणे 1 व 2 येथील शिक्षकांनी मिळून आदिवासी साहित्य कला दालन आयोजित करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाट्न शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.अरुण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ देखील प्रसंगी उपस्थित होते.


