शिक्षण आणि सुसंवादाचा संगम: सहायक आयुक्तांची चाळीसगाव शासकीय निवासी शाळेला सदिच्छा भेट

शिक्षण आणि सुसंवादाचा संगम: सहायक आयुक्तांची चाळीसगाव शासकीय निवासी शाळेला सदिच्छा भेट
जळगाव –
– सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी चाळीसगाव येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेला सदिच्छा भेट देत शाळेतील शैक्षणिक सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या डिजिटल शिक्षण पद्धतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत शिक्षण घेत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांशी हसत-खेळत संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी विविध बाबींवर त्यांनी सूचना दिल्या.
ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून शिक्षणाच्या गुणवत्तेला चालना देणारी ठरली आहे.

