शिवछत्रपती गणेश मित्र मंडळ म्हसावद यांच्यातर्फे अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य वाटप

शिवछत्रपती गणेश मित्र मंडळ म्हसावद यांच्यातर्फे अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य वाटप
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील शिवछत्रपती गणेश मित्र मंडळ म्हसावद यांच्यातर्फे अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष शहादा, तळोदा मतदार संघाचे आमदार साहेब राजेशजी पाडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. मकरंदभाई पाटील, पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी वारुळे पोलिस स्टेशन म्हसावद, कुबेर हायस्कुल म्हसावद संस्थेचे चेअरमन श्री. अनिल पाटील, कुबेर हायस्कुलचे प्राचार्य श्री. मनोज पाटील सर, सरपंच श्री. युवराज ठाकरे, श्री. चिंतामण लांडगे, केंद्रप्रमुख श्री. पराग चव्हाण,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धीचे देवता श्री. गणेशाची करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे यांनी केले. जि.प. कन्या शाळा म्हसावद येथील विद्यार्थिनींनी सुमधुर अशा स्वरात कृतीयुक्त ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
त्यानंतर मान्यवरांच्या परिचय, स्वागत तसेच प्रमुख पाहुणे यांचा शिवछत्रपती गणेश मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व रोख रकमेची पारितोषिके तसेच अनाथ, गरीब आणि होतकरू बालकांना शैक्षणिक साहित्य, शालेय दप्तर देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच जि. प. कन्या शाळा म्हसावद येथील विद्यार्थीनी कु. निशिता सोनार हिने कार्यक्रमाबाबत व गणेश उत्सवाबाबत इंग्रजीत भाषण केले.
यावेळी शिव छत्रपती मंडळाचे संस्थापक सत्तार दादा ठाकरे, गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश सूर्यवंशी, एन. डी. टी .व्ही प्रतिनिधी श्री. अशोक भील, सचिव श्री. दिपक राजपूत, खजिनदार श्री. किरण धनगर, संयोजक श्री. कृष्णा जगदाळे, सदस्य श्री. चेतन कोळी, अंतोष गोसावी, मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे, पंडित रावताळे सर, इरेशा आजुरे, वैशाली गोसावी, चेतना राठोड, आशा धनगर, प्रशिक्षणार्थी ममता अहिरे, रंजना पावरा, गायत्री माळी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी सर्वांचे आभार एन. डी. टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी श्री. अशोक भील यांनी मानले.



