श्रावणी केंद्राच्या शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न


श्रावणी केंद्राच्या शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
नंदुरबार दि.२ नवापूर तालुक्यातील श्रावणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा येथे श्रावणी केंद्राची एक दिवसांची शालेय क्रीडा महोत्सव अर्थात फिट इन इंडिया उत्स्फूर्तपणे संपन्न झाला आहे.
पहिली पासून ते सातवी पर्यंत एकूण १०५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती शिक्षण विभाग नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व रिबीन फित कापून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा मोनिका कोकणी, सरपंच संदिप कोकणी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूरज कोकणी, उपसरपंच
निलेश वळवी, ग्रामपंचायत सदस्य रुपेश कोकणी, ग्रामपंचायत सदस्य जोसेफ कोकणी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संदिप कोकणी, सुधाकर कोकणी, केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, केंद्रीय मुख्याध्यापक भटू बंजारा, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमात प्रसन्न वातावरण निर्माण केले. गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी सांगितले की, शारिरीक शिक्षण, सांघिक कार्य आणि सर्वांगीण कल्याणासाठी विद्यार्थ्यांना खेळाविषयी माहिती, नियमित व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य, ताकद आणि लवचिकता सुधारते. खेळामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते, खेळ संवाद, सहकार्य आणि सौहार्द वाढवतात. खेळांमध्ये भाग घेतल्याने विद्यार्थ्यांना कार्यांना प्राधान्य देणे आणि वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे, खेळ विद्यार्थ्यांना सकारात्मक आत्म-प्रतिमा आणि आत्मविश्वास विकसित करण्यास मदत करू शकतात. विद्यार्थ्यांना जे आवडते ते शोधण्यासाठी विविध खेळांचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करा. एखादा खेळ निवडताना विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता आणि कौशल्य पातळी विचारात घ्या. विद्यार्थ्यांना दुखापती टाळण्यासाठी वॉर्म-अप आणि कूल-डाउन व्यायामाचे महत्त्व शिकवा. खेळामध्ये निष्पक्ष खेळ आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांना दयाळूपणे जिंकण्यासाठी आणि हार स्विकार करण्याचे मानसिक कौशल्य विकसित करण्याचे कसब प्राप्त होणे गरजेचे आहे. क्रीडा सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय क्रीडा कार्यक्रम आणि सुविधांचा वापर करा असेही वक्तव्य करण्यात आले. एक दिवसीय स्पर्धा याप्रसंगी केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनीही मनोगतातून शालेय जीवनामध्ये योगा अभ्यासाला ही महत्व आहे, असे शाळेतील विद्यार्थ्यांना पटवून देत या विषयांमध्ये खेळ तासिका शिक्षण देण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा पातळीपर्यंत घेऊन जावून असे विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व लहान गट, मोठा गट खो-खो मुले- मुली, कबड्डी लहान गट, मोठा गट, पोती उड्या मारणे, लिंबू चमचा, मैदानावर १०० मिटर धावणे, स्पर्धा घेण्यात आल्या तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील सर्व विजेता संघातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. एक दिवशीय क्रिडा महोत्सवात सर्व शिक्षक, पंच मंडळ, त्यांना सहाय्यक पंच, लेखन समिती, तसेच सर्व समिती प्रमुखांनी एक दिवस शालेय क्रिडा महोत्सव यशस्वीतेसाठी शाळेतील क्रीडासमितीतील क्रीडाप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक भटू बंजारा, सीमा पाटील, गणेश पाडवी, धिरज खैरनार, कृष्णा रायते, बकाराम सुर्यवंशी, ईश्वर गावीत, दिनेश पाडवी, मनिषा कोकणी, केशव पवार, जगदीश कोकणी, राजेंद्र वसावे, कनिलाल कोकणी,
संगीता सोनवणे, मनीषा कोकणी, मालिनी वळवी, जयश्री भामरे, ज्योती निकुंभ, अभिषेक गायकवाड, तेजस्विनी बिराडे प्रशिक्षणार्थी, सुबोध वळवी प्रशिक्षणार्थी यांनी व सर्व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.



