आर्थिक
निर्सगाचे उपासक , रक्षक या भुमिकेतून आदिवासी बाधवांनी मायभुमीची सेवा केली — नामदार गिरीश महाजन

निर्सगाचे उपासक , रक्षक या भुमिकेतून आदिवासी बाधवांनी मायभुमीची सेवा केली — नामदार गिरीश महाजन
जामनेर – वृषभ इंगळे
विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात सहभागी होत सर्व आदिवासी बंधू-भगिनींसोबत नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी संवाद साधला.
निसर्गाचे उपासक व रक्षक या दोन्ही भूमिकेतून आदिवासी बांधवांनी मायभूमीची सेवा केली आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत काल साजरा करत असताना आदिवासी महिला असलेल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपतीजी मुर्मु देशाच्या प्रथम नागरिक म्हणून जगभरात देशाचे नाव उज्वल करत आहेत. आदिवासी समाजाच्या विकासाची हीच वाटचाल यापुढेही अनंतकाळ सुरू राहावी अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या.


