
जामनेर प्रतिनीधी – वृषभ इंगळे
सिंचन विभाग आणि मा. व्ही. डी. पाटील हे जणू एकमेकांचे पूरक घटकच. अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी नावीन्यपूर्ण संकल्पना आणि कल्पकतेची जोड देत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प साकारले.
मेगा रिचार्ज प्रकल्प, बोदवड उपसा योजना आणि जामनेरमधील कमानी तांडा हे त्यांच्या दूरदृष्टीचे भक्कम दाखले आहेत.
विश्वासाचा सेतू –
शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष नव्हे तर विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, यावर त्यांचा भर होता. त्यामुळेच शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रशासन या सर्वच स्तरावर त्यांना मान्यता मिळाली.
माहिती आयुक्त पदावर न्यायप्रियता –
सेवानिवृत्तीनंतर माहिती आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी अभ्यासपूर्ण, पारदर्शक आणि काटेकोर कार्यशैलीने अनेक अपील प्रकरणे जलद गतीने निकाली काढली. यामुळे अर्जदारांना दिलासा मिळाला आणि “न्यायप्रिय अधिकारी” अशी त्यांची नवी ओळख तयार झाली.
सेवानिवृत्तीनंतरही सक्रियता-
निवृत्तीनंतर शांत बसण्याऐवजी आजही ते जिल्ह्यातील सिंचन विकास आणि शेतकरी कल्याणासाठी कार्यरत आहेत. शेततळे योजना, पाणीटंचाई निवारण आणि जलसंधारणाच्या नव्या कल्पनांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.
जामनेर तालुक्याला पाणीटंचाईपासून वाचवण्यात त्यांची दुरदृष्टी निर्णायक ठरली आहे.
जनतेची अपेक्षा –
आज जळगाव जिल्ह्यातून एकच अपेक्षा व्यक्त होते – शासनाने अशा दुरदृष्टी व अनुभवी अधिकाऱ्यांचा अनुभव मोठ्या जबाबदारीवर वापरावा. जलसंपदा विभागात त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे जनहिताचे अनेक प्रकल्प गतीमान होतील, असा जनतेचा ठाम विश्वास आहे.
👉 मा. व्ही. डी. पाटील साहेब – केवळ एक अधिकारी नव्हे, तर सिंचन क्षेत्रातील जलपुरुष आणि जळगाव जिल्ह्याचा खरा अभिमान.

—



