सौ. साधना गिरीश महाजन (माजी नगराध्यक्षा, जामनेर नगर परिषद)
सदाशिव इंगळे संपादक दैनिक जळगाव प्रहार

सौ. साधना गिरीश महाजन
(माजी नगराध्यक्षा, जामनेर नगर परिषद)
आजच्या या विशेष दिनानिमित्त —
सौ. साधना गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
आपले जीवन आपल्या नावाप्रमाणेच “साधना” या अर्थाला साजेसे आहे.
कुटुंबातील परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि राजकीय जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधत, आपण नेहमीच समाजकारणात आपला ठसा उमटविला आहे.
भाजप परिवारातील प्रत्येक कार्यकर्त्याशी आपले आत्मीयतेचे नाते, त्यांच्या सुखदुःखात सहभाग, आणि मायेचा हात देऊन आधार निर्माण करण्याची आपली वृत्ती ही प्रेरणादायी आहे.
मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सामाजिक व राजकीय कार्यात आपण निभावलेली खंबीर साथ ही त्यांच्या यशामागील एक महत्त्वाची शक्ती आहे.
भाऊंच्या गैरहजेरीतही प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविणे, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल संवेदनशील राहणे, आणि आपल्या सौजन्यपूर्ण वर्तनाने सर्वांच्या मनात “साधना काकू” म्हणून आपले स्थान निर्माण करणे — हे आपले विलक्षण व्यक्तिमत्त्व अधोरेखित करते.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या आणखी उंच शिखरावर पोहोचण्याचे सामर्थ्य लाभो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
सदाशिव इंगळे संपादक
दैनिक जळगाव प्रहार


