
श्रावणी जि.प. शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांनी “स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत मंदिर परिसर स्वच्छता अभियान नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा श्रावणी येथे स्वच्छता हिच सेवा अभियान योजना अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. शिक्षिका सीमा पाटील यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबांच्या जीवन चरित्रविषयी माहिती दिली. स्वच्छ भारत, सुंदर शाळा
भारत सरकारने स्वच्छ भारत मिशनचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावनकुमार यांच्या “स्वच्छ हिच सेवा” अभियान सुरु केले आहे. शाळांमध्ये पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी, अपंगासाठी स्वतंत्र शौचालये, हात धुण्याची सुविधा या सुविधासोबतच त्यांचा वापर, देखभाल व दुरुस्ती, विद्यार्थी , शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांची क्षमता बांधणी अशा प्रमुख घटकावर कार्य करण्याचे निश्चित केलेले आहे. विद्यार्थी जीवनात स्वच्छतेचे महत्व मोठे आहे. विद्यार्थी जीवनात त्यांना आरोग्यदायी सवयी लागल्या तर संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्याचा लाभ होतो. शाळेमध्ये पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा विद्यार्थी उपस्थिती व गुणवत्तेवर चांगला परिणाम होतो. भारत सरकारने हे स्वच्छता हीच सेवा अभियान सुरु केले आहे. हे अभियान केवळ स्वच्छतेपुरतेच मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या एकूण विकासाशीही ते निगडीत आहेत. शाळेतील पिण्याचे पाणी, हात धुण्याची सुविधा व स्वच्छतागृहे यांची नियमितपणे देखभाल व दुरुस्ती होणे. शालेय परीपाठामधून नियमितपणे स्वच्छता विषयक कामाचा सहभाग असावा. स्वच्छता विषयक उपक्रमामुळे केवळ शाळेच्या भौतिक सुविधेतच वाढ होते असे नसून शाळेचा एकंदर गुणवत्ता विकास होण्यास मदत होते. प्रत्येक शाळा स्वच्छ व सुंदर होणे काळाची गरज आहे. असेही केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक भटू बंजारा यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या संतांचे विचार हे आपण आपल्या कृतीतून साकारले पाहिजे. स्वच्छता हीच खरी सेवा असून त्यात सातत्य ठेवले पाहिजे. आपण या थोर समाजसुधारकांचा आदर्श ठेवून आपले जीवन जगले पाहिजे. यावेळी शाळेतील केंद्र मुख्याध्यापक भटू बंजारा, शिक्षिका संगीता सोनवणे, भारती सोनवणे, मालिनी वळवी, मनीषा कोकणी, सहशिक्षक राजेंद्र वसावे, मोबीलायझर अरुणाताई आदींसह विद्यार्थ्यांसोबत परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सोनवणे यांनी केले व उपस्थितांचे आभार राजेंद्र वसावे यांनी मानले.



