मतदानाच्या 48 तास अगोदर 11 मे पासून 13 मे मतदान संपेपर्यंत मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंदचे आदेश
▪ मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी बंदचे आदेश
जळगाव, —
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करिता निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील 03-जळगाव व 04-रावेर या दोन लोकसभा मतदार संघाकरिता दिनांक 13 मे, 2024 रोजी मतदान होणार असुन दिनांक 4 जुन,2024 रोजी संबंधित निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी मतमोजणी होणार आहे. तरी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुउपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणा-या वस्तुच्या वाटपावर अकुंश ठेवण्यासाठी उपाययोजना करणे तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याकरिता मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.
जिल्हाधिकारी, जळगाव यांनी लोकप्रतिनिधत्व अधिनियम 1951 चे कलम (सी) महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 चे नियम 26 (1) (सी) (1), महाराष्ट्र विदेशी मद्य (रोख विक्री व विक्री नोंदवहया इ.) नियम 1969 चे नियम 9 अे (2) (सी) (1), महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती देणे) व ताडी झाडे (छेदणे) नियम 1968 चे नियम 5 (अे) (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार जळगाव जिल्हयातील पुढीलप्रमाणे नमुद कार्यक्षेत्रातील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
दिनांक 11 मे, 2024 रोजी मतदानाची वेळ संपण्यापुर्वी 48 तास आगेदर पासून संपुर्ण जळगाव जिल्हा सायंकाळी 6 वाजेपासून बंद. दिनांक 12 मे, 2024 रोजी मतदानाच्या अगोदरचा दिवस संपुर्ण जळगाव जिल्हा संपुर्ण दिवस. दिनांक 13 मे, 2024 रोजी मतदानाचा दिवस संपुर्ण जळगाव जिल्हा मतदान प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत बंद. दिनांक 4 जुन, 2024 रोजी मतमोजणीचा दिवस संपुर्ण जळगाव जिल्हा संपुर्ण दिवस बंद. अशाप्रकारे आदेशाचे उल्लघंन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळुन आल्यास संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.
0 0 0 0 0