ग्रामीण
रा कॉ पक्षातर्फे श्रीराम पाटील यांना उमेदवारी
रा कॉ पक्षातर्फे श्रीराम पाटील यांना उमेदवारी
जळगाव —
रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे श्री श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे , याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली.
भाजपा कडून या आधीच विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर केली गेली आहे .
रावेर लोकसभा मतदार संघात कार्यकर्ते मेळावा , घर परत भेटी गाठी यावर भर देऊन प्रचार सुरु करण्यात आला आहे .
रा कॉ पक्षातर्फे संतोष चौधरी , ॲड रविंद्र पाटील यांच्यासह इतर जन निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते ,
मात्र अखेर उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे , त्यामुळे खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे .
तसेच उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचा सामना कसा रंगणार हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे .