ग्रामीण

बजेट अन तांत्रिक अडचणी, शासनाच्या निर्देशाला केराची टोपली, प्राथमिक शिक्षकांचे अर्थकारण बिघडले!

बजेट अन तांत्रिक अडचणी, शासनाच्या निर्देशाला केराची टोपली, प्राथमिक शिक्षकांचे अर्थकारण बिघडले! नंदुरबार दि.१५( प्रतिनिधी ) जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सातत्याने विलंब होत आहे. सीएमपी प्रणालीत होत असलेल्या अडचणी व शासनाकडून बजेट मंजूर होत नसल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील ३७६५ शिक्षकांच्या वेतनाला दर महिन्याला उशीर होत आहे. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्यामार्फत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन,आंदोलन करूनही बाबतची दखल घेत नाही. शासनाच्या निर्देशाचेही झाले नाही पालन मध्यंतरी शासनाने रमजान ईद व गुढीपाडवा सण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश त्वरित निर्गमित करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठपुरावा करण्यात आलेला होता. परंतु आज अखेर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम न मिळाल्यामुळे शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहे. शिक्षकांचा पगार करावा, असे निर्देश दिले होते. गुढीपाडवा झाला, रमजान ईदही साजरी झाली. मात्र तरीही शिक्षकांचा पगार वेळेवर झाला नाही. शासनाच्या निर्देशाचेही पालन होत नसल्याची खंत महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई आदी पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग शासनाच्या आदेशाला केराची टोपली प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मार्च महिन्यातील प्राथमिक विभागाचे वेतन उशीरा होत असल्यामुळे अद्याप प्राथमिक विभागाचे वेतन झाले नसल्याने शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. शिवाय खासगीच्या प्राथमिक या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवणारे हजारो शिक्षक आहेत. पूर्वी शिक्षकांचे वेतन शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा होत होते. तेथून मुख्याध्यापक संबंधित शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करत. मात्र, सध्या शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते. या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांतील त्रुटींमुळे वेतन अदा करण्यास सातत्याने विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. शासन परिपत्रकानुसार शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला झाले पाहिजे. वेतन उशिरा होत असल्याने प्राथमिक शिक्षकांना कर्जासाठी नाहक व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. उशिरा वेतन झाल्याने अनेकांचे सिबिल खराब होत आहे. हा महिना सणासुदीचा असतानाही वेतन शिक्षकांच्या खात्यात उशिरा जमा पर्यंतही जमा नाही.शिक्षकांचा पगार वेळेवर व्हावा, यासाठी प्रहार शिक्षक संघटना सातत्याने वेतन अधीक्षकांच्या संपर्कात आहे. चर्चा, बैठका, निवेदन देऊनही शिक्षकांचा पगार वेळेवर होत नाही. शिक्षण विभाग शिक्षकांचा पगार वेळेवर करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. भविष्यात प्रहार शिक्षक आक्रमक पवित्रा घेईल.अशा इशारा प्रशासनाला देण्यात येईल.——- दर महिन्याच्या १ तारखेला होणार शिक्षकांचा पगार १५ तारीख ओलांडली तरी झालेला नाही. सातत्याने शिक्षकांच्या वेतनाला उशीर होत आहे. वेळेवर पगार व्हावा, यासाठी आमच्या प्रहार शिक्षक संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. वेळेवर पगार होत नसेल तर आम्ही कडक भूमिका घेऊ. – गोपाल गावीत.

जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना,नंदुरबार

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}