शहरी

अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा फार्म ऑनलाईन भरावेत

जळगाव दि.25

अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत अन्न व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांना आवाहन करण्यात येते की, सन 2023-2024 या महसुल वर्षापसुन वार्षिक परतावा फॉर्म डी -1 मध्ये भरण्यासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपला परतावा अर्ज करते वेळीचा युझर आय डी व पासवर्ड वापरुन https://foscos.fssai.gov.in  या सकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. तसेच अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळावर युझरआयडी वा पासवर्ड माहित नसल्यास   https://foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर जावुन  forget password or login id  टाकुन नविन  login id व  password generate  करावा व त्यानंतर अन्न व्यावसायिकांचा वार्षिक परतावा फॉर्म डी- १ सादर करावा.

तसेच वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 1800112100 अथवा helfdesk-foscos@fssai.gov.in  या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. डी -1 फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 31 मे, 2024 असुन सदर तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिन 100 रुपये या प्रमाणे दंड शुल्क भरावे लागेल याची सर्व उत्पादक आस्थापनांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त स. कृ. कांबळे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}