विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्डचे वाटप
महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य “सुधारणा व पुनर्वसन” अंतर्गत डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नुकतीच अतिसंवेदनशील जळगाव जिल्हा कारागृहास भेट दिली. सदरच्या भेटीदरम्यान समता फाऊंडेशन मुंबई व जळगाव जिल्हा कारागृह यांचे संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या शिबीरादरम्यान कारागृहात दाखल असलेल्या बंद्याचे आयुष्यमान भारत (गोल्डन) कार्ड बनविण्यात आले होते. आयुष्यमान भारत (गोल्डन) कार्ड डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे शुभहस्ते बंद्यांना वाटप करण्यात आले आहे.
तसेच महोदयांनी कारागृह संचार फेरी घेवून कारागृह अधिकारी/कर्मचारी व बंद्यांच्या अडीअडचणी जाणुन घेवुन त्यांचे निराकरण केले व नवनिर्मित भुसावळ जिल्हा कारागृह येथील जागेची पाहणी केली आहे. असे ओ.आर.वांडेकर अधीक्षक, जळगांव जिल्हा कारागृह वर्ग-२ यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.